पत्रकार रोहित रंजन यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय घेणार सुनावणी | पुढारी

पत्रकार रोहित रंजन यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय घेणार सुनावणी

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा बनावट व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप झालेल्या पत्रकार रोहित रंजन यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालय तयार झाले आहे. रोहित यांना मंगळवारी नोएडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर सायंकाळी त्यांना स्थानिक न्यायालयाने जामीन दिला होता.

पत्रकार रोहित रंजन जामिनावर बाहेर आल्यानंतर त्यांना छत्तीसगड पोलीस अटक करून त्यांच्या राज्यात नेऊ पाहत आहेत, त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली असल्याचे रोहित यांचे वकील सिद्धार्थ लुथरा यांनी सांगितले आहे. रोहित यांच्याविरोधात अनेक राज्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. छत्तीसगड राज्यातही एक गुन्हा दाखल झाला होता. त्या अनुषंगाने छत्तीसगड पोलिसांचे एक पथक रोहित यांना अटक करण्यासाठी नोएडामध्ये मंगळवारी आले होते. रोहित यांना अटक करून गाडीत बसविले जात असतानाच गाझियाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रोहित यांना ताब्यात घेतले होते. त्यावेळी छत्तीसगड पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांची वादावादी झाली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button