VIRAL VIDEO : असा अवलिया जो १५ सेंकदात काढून देतो ३ रेल्वे तिकीटे | पुढारी

VIRAL VIDEO : असा अवलिया जो १५ सेंकदात काढून देतो ३ रेल्वे तिकीटे

पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्ही जर मुंबईतील असाल तर तुम्हाला मुंबईच्या गतीची कल्पना असेलच. इथे सर्व गोष्टी अत्यंत जलद घडत असतात व ती गती पकडण्यासाठी सर्वांनाच मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे मुंबईतील लोकल रेल्वेची गती आणि ती पकण्यासाठी करावी लागणारी कसरत देखिल माहित असेलच. त्याच प्रमाणे सध्या या व्यक्तीचे तिकीट काढून देण्याची गती पाहिली तर आपल्याला निश्चीतच मुंबईच्या आणि रेल्वेच्याही गतीची कल्पना येईल. ही पोस्ट ट्वीटरवर मुंबई रेल्वे युजर्स कडून करण्यात आली आहे.

रोज रेल्वे अथवा लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या व्यक्तीला लोकल पकडण्याची आणि तिकीट काढण्याची घाई असतेच. तसेच अनेकवेळा तिकीट काढण्यासाठी मोठ्या रांगेत देखिल उभं रहावे लागते. पण, प्रवाशांना अत्यंत कमी कालावधीमध्ये मुंबई येथील एक निवृत्त कर्मचारी तिकीट एटीएम मशिन मधून तिकीट काढून देतो. त्यांची तिकीट काढण्याची गती पाहिली तर आपण सुद्धा थक्क होऊ. प्रवाशाला हव्या असणाऱ्या इच्छित स्थळाचे तिकीट ही व्यक्ती अत्यंत कमी कालावधीत काढून देते. अगदी १५ सेकंदाच्या काळात तीन प्रवाशांना या व्यक्ती कडून तिकीट काढून दिले जाते. ही गती सामन्यांसाठी थक्क करणारीच आहे.

ही व्यक्ती तिकीट काढून देत असलेला व्हिडिओ ट्वीटरवर पोस्ट करण्यात आलेली आहे. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. शिवाय अनेक जण या तिकीट काढून देणाऱ्या व्यक्तीचे कौतुक देखिल करत आहेत. मुबंईच्या वेगवान जीवनाला चेहरा असता तर असे देखिल ट्वीटवर अनेक युजर्सनी म्हटले आहे.

Back to top button