फलोत्पादन क्षेत्राला प्रोत्साहनाची गरज : कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर | पुढारी

फलोत्पादन क्षेत्राला प्रोत्साहनाची गरज : कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा :  कृषी क्षेत्रात खते तसेच कीटकनाशके यांचा अतिवापर कमी करण्यासाठी खासगी क्षेत्राने सरकारला सहयोग द्यावा,असे आवाहन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी केले आहे.

देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे योगदान फार मोठे आहे. त्यामुळे देशात फलोत्पादन क्षेत्राला देखील प्रोत्साहन देवून आत्मनिर्भरतेच्या दृष्टीने पाऊल टाकले पाहिजे, असे तोमर म्हणाले. भारतीय वाणिज्य आणि उद्योग महासंघाच्यावतीने नुकत्याच आयोजित ११ व्या कृषीरासायनिक परिषदेला संबोधित करताना त्यांनी हे आवाहन केले.

आपल्याच लोकांनी पाठीत खंजीर खुपसला : उद्धव ठाकरे

पुढे बोलताना ते म्हणाले, देश अन्नधान्य उत्पादनाच्या बाबतीत अत्यंत सुस्थितीत आहे. जागतिक पातळीवरील स्पर्धेत उतरण्याच्या दृष्टीने देशाला शेतीच्या बाबतीत अधिक विकसित राष्ट्रांकडे पाहून नव्या गोष्टी शिकाव्या लागतील आणि त्यांच्यासोबतच पुढे जावे लागेल. तसेच देशात सध्या १० हजार नव्या शेतकरी उत्पादक संघटना उभारल्या जात आहेत. शेतकऱ्यांना त्यांचा मोठा लाभ होत असून ते भविष्यातही अधिक लाभदायक ठरणार असल्याचे, मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

याबरोबरच पिकांमध्ये वैविध्य आणण्यासाठी प्रोत्साहनाची असून कृषी विज्ञान केंद्रे शेतकऱ्यांसाठी फार उपयुक्त ठरत आहेत. फिक्कीसारख्या औद्योगिक संस्थांनी कृषी विकासासाठी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Back to top button