Ayodhya : शरयू नदीत आंघोळ करताना पती-पत्नीचं चुंबन, जमावाकडून बेदम मारहाण (व्हिडिओ) | पुढारी

Ayodhya : शरयू नदीत आंघोळ करताना पती-पत्नीचं चुंबन, जमावाकडून बेदम मारहाण (व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकमेकांवरील प्रेम व्यक्त करण्यासाठी पती- पत्नीकडून वेगवेगळ्या पर्यायांचा वापर केला जातो. कधी भेटवस्तू, तर कधी बाहेर फिरायला जाऊन आपल्या प्रेमभावना व्यक्त केल्या जातात, परंतु आधुनिक जमान्यात प्रेम व्यक्त करण्याचा अनोखा फंडा वापरला जातो. प्रेमीयुगुल आणि पती पत्नी आता सार्वजनिक ठिकाणीही आपल्या प्रेमाचे रंग उधळताना (Couple attack in Ayodhya) दिसतात. परंतु, यामुळे सामाजिक नीतीमत्तेचा भंग होतो.  तर असले प्रकार कधी चांगलेच अंगलट येतात.

(Couple attack in Ayodhya) अशाच एक प्रकार उत्तर प्रदेशातील अयोध्येतील शरयू नदीत आपल्या पत्नीसोबत आंघोळ करताना एकाला आला. ती व्यक्ती आपल्या पत्नीसोबत आंघोळ करताना तिला चुंबन करत होती. यावेळी त्यांच्या आसपास बरेच लोक आंघोळ करत होते. याचे त्यांना भान राहिले नाही. ते आपल्या प्रणयक्रिडेत बेभान झाले होते. दरम्यान, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी त्या व्यक्तीला पाण्याबाहेर ढकलून काढत त्याला चांगलाच चोप दिला. तर, त्याची पत्नी त्याला जमावाच्या तावडीतून सोडविण्यासाठी विनवणी करत होती.

या घटनेचा कथित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परंतु, या प्रकरणी तक्रार पोलिसांत दाखल झालेली नाही. उत्तर प्रदेशातील अयोध्येतील शरयू नदीत आपल्या पत्नीसोबत आंघोळ करत असताना एका व्यक्तीला जमावाने मारहाण केली. याबाबत अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही. तथापि, आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत आणि त्या जोडप्याचा आणि त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या बदमाशांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहोत, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) शैलेश पांडे यांनी सांगितले.

एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना नेमकी कधी घडली हे अद्याप समजू शकलेले नाही. तर काही लोकांनी दावा केला आहे की, मंगळवारी राम की पौडी घाटावर ही घटना घडली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button