भारत सोडून जाण्याच्या तयारीत 8 हजार कोट्यधीश | पुढारी

भारत सोडून जाण्याच्या तयारीत 8 हजार कोट्यधीश

नवी दिल्ली : भारत सातत्याने प्रगती करत आहे आणि देशातील करोडपतींची संख्याही वेगाने वाढत आहे. मात्र, या श्रीमंतांचे मन देशात रमत नसल्याचे चित्र दिसत आहे. एका अहवालात हा दावा करण्यात आला आहे. सुमारे आठ हजार भारतीय कोट्यधीश यावर्षी परदेशात स्थायिक होण्याची तयारी करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

ब्रिटनमधील हेन्ले ग्लोबल सिटीझन रिपोर्ट ही संस्था जगभरातील खासगी संपत्ती आणि गुंतवणूक स्थलांतरितांच्या ट्रेंडस्वर लक्ष ठेवून असते. या संस्थेच्या २०२२ मधील अहवालात म्हटले आहे की, यामागील सर्वात मोठे कारण करांशी (टॅक्स) संबंधित कठोर नियम हे आहेत. देशातील कोट्यधीश अशा देशात स्थायिक होण्याचा विचार करत आहेत, की, ज्या देशातील पासपोर्ट व्यवस्था अधिक मजबूत असेल. याशिवाय उच्च जीवनशैली, उत्कृष्ट शैक्षणिक आणि आरोग्य सुविधांबरोबरच व्यापार आणि गुंतवणुकीच्या अधिक चांगल्या शक्यता शोधणे यासारखीही प्रमुख कारणेही यामागे आहेत.

संयुक्‍त अरब अमिरातीला प्राधान्य

संयुक्‍त अरब अमिरात (यूएई) या देशात स्थायिक होण्यास श्रीमंतांचे प्राधान्य असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्याशिवाय ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, इस्रायल, स्वित्झर्लंड, अमेरिका, पोर्तुगाल, ग्रीस, कॅनडा आणि न्यूझीलंड या देशांचाही टॉप टेनमध्ये समावेश आहे.

  • करमुक्‍तीसाठी परदेशात स्थायिक होण्याचा विचार

हेही वाचा

Back to top button