अंटार्क्टिकामधील सर्वात जास्त खोल भागाचा शोध | पुढारी

अंटार्क्टिकामधील सर्वात जास्त खोल भागाचा शोध

वॉशिंग्टन : संशोधकांनी ‘अंटार्क्टिका’मधील सर्वात थंड असलेल्या दक्षिणी महासागराचा नकाशा नुकताच प्रसिद्ध केला आहे. या महासागरातील सर्वात खोल ठिकाण म्हणजे ‘फॅक्टोरियन डीप’ होय. या ठिकाणी हा महासागर तब्बल 24,400 फूट खोल आहे.

अमेरिकन संशोधक आणि इंटरप्रोनॉर विक्टर वेस्कोवो यांनी 2019 मध्ये ‘फॅक्टोरियन डीप’चा शोध लावला होता. त्यांनी जगातील पाच महासागरीतील सर्वात खोल ठिकाण शोधण्याची मोहीम सुरू केली होती. फॅक्टोरियन डीपचा शोध हा याच मोहिमेचा भाग होता. संशोधक वेस्कोवो यांनी स्वतः अंटलांटिक महासागरात दक्षिण दिशेला असलेल्या सँडविच ट्रेंचमध्ये ‘लिमिटिंग फॅक्टर’ नामक पाणबुडी चालवली होती. सँडविच ट्रेंच ही एक अशी खोल दरी आहे की, ती 965 कि.मी. इतक्या अंतरापर्यंत पसरली आहे. वेस्कोवो यांनीच सर्वप्रथम सँडविच ट्रेंचची पूर्णपणे खोली मोजली होती.

सँडविच ट्रेंचला समांतर असलेल्या दक्षिणी महासागरातील सर्वात खोल भागाचाही वेस्कोवो यांनीच शोध लावला. यास ‘फॅक्टोरियन डीप’ असे नाव देण्यात आले. हाच खोल भाग ‘सिफ्लोअर मॅप’वर दाखवण्यात आला आहे. अवघ्या काही दिवसांपूर्वीच ‘सायंटिफिक डेटा’ नामक जर्नलमध्ये फॅक्टोरियन डीपबाबत सविस्तर माहिती आणि नकाशा प्रसिद्ध करण्यात आला आहे. फॅक्टोरियन डीप संदर्भात अजूनही संशोधन करण्याची आवश्यकता असल्याचे संशोधकांचे मत आहे.

Back to top button