Assam flood update | आसाममध्ये महापुरामुळे 23 मृत्यू; 12 जिल्ह्यांमध्ये 3.37 लाख नागरीकांना पुराचा फटका

Assam flood update | काझीरंगा नॅशनल पार्क व पोबितोरा वन्यजीव अभयारण्य अजूनही पाण्याखाली
flood
floodPudhari
Published on
Updated on

Assam Flood 2025 Brahmaputra river death toll Kaziranga flood impact

गुवाहाटी : आसाममधील पूरस्थितीत थोडी सुधारणा झाली असली तरी राज्यातील 12 जिल्ह्यांमधील सुमारे 3.37 लाख नागरिक अजूनही पुराच्या तडाख्यात आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी रविवारी दिली. सरकारी बुलेटिननुसार, आतापर्यंत पुर आणि भूस्खलनामुळे एकूण 23 जणांचा मृत्यू झाला आहे, यामध्ये 6 जण भूस्खलनात मरण पावले आहेत.

सर्वाधिक प्रभावित भाग : श्रीभूमी

श्रीभूमी हा आसाममधील सर्वाधिक पूरप्रभावित भाग असून, 1.93 लाखांहून अधिक लोक तिथे पुराच्या विळख्यात आहेत. इतर प्रभावित जिल्ह्यांमध्ये हैलाकांडी येथील 73724 तर कछार येथील 56398 नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.

flood
water emergency | सन 2030 पर्यंत 'या' शहरातील भूजल संपणार; 70 लाख लोकसंख्येचं काय होणार? केवळ 4.5 वर्षे हातात...

पूराची सध्याची स्थिती

  • एकूण 337358 नागरिकांना पुराचा फटका बसला आहे.

  • 41 सर्कल व 999 गावे प्रभावित झाली आहेत.

  • 36000 हून अधिक नागरिकांनी 133 मदत छावण्यांमध्ये आश्रय घेतला आहे.

  • 68 मदत वितरण केंद्रांतून गरजूंना मदत पोहचवली जात आहे.

  • पुरामुळे 12659 हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.

  • 2 जिल्ह्यांमध्ये शहरी पूरामुळे 284 लोक प्रभावित

  • काझीरंगा नॅशनल पार्क व पोबितोरा वन्यजीव अभयारण्य अजूनही पाण्याखाली आहे.

नद्या आणि जल परिस्थिती

ब्रह्मपुत्रा नदीसह प्रमुख नद्यांचा पूर सध्या ओसरत असला तरी काही नद्या अजूनही धोक्याच्या पातळीवर आहेत. धुब्री येथे ब्रह्मपुत्रा, धरमटुल येथे कोपिली, बीपी घाट येथे बराक, आणि श्रीभूमी येथे कुशियारा धोक्याच्या पातळीवर वाहत आहेत.

flood
Reliance Industries | रिलायन्सच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; टेक टॉप 30 लिस्टमध्ये पटकावले स्थान, पहिलीच भारतीय कंपनी

फेरी सेवा आणि वाहतूक व्यवस्था

मागील आठवड्यापासून बंद असलेल्या ब्रह्मपुत्रा नदीवरील फेरी सेवा रविवारी अंशतः सुरू करण्यात आली.

  • गुवाहाटी – मध्याम खांडा फेरी सेवा सध्या गुवाहाटी राजाद्वार घाटावरून सुरू केली जाणार आहे.

  • गुवाहाटी – कुरुआ फेरी सेवा सोमवारपासून सुरू होईल.

गुवाहाटी परिसरात लाकडी बोटींचा वापर अजूनही बंद, नदीची स्थिती पाहून निर्णय घेण्यात येणार.

अधिकार्‍यांनी सांगितले की, परिस्थिती सुधारत असली तरी प्रशासनाकडून सतत नजर ठेवली जात आहे आणि गरजूंना मदतीचा हात दिला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news