

Kabul water crisis groundwater depletion
काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमधील जलस्त्रोत 2023 पर्यंत म्हणजेच अवघ्या 5 वर्षात आटतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे. काबूलची लोकसंख्या सुमारे 70 लाख इतकी आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी ही निश्चित्तच वाईट बातमी आहे.
काबूलच्या भूमिगत जलस्रोतांमधील पाण्याची पातळी गेल्या दहा वर्षांत सुमारे 30 मीटरने (जवळपास 100 फूट) कमी झाली आहे. यामुळे शहरातील जवळजवळ निम्मे बोरिंग विहिरी जी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत आहेत, पूर्णपणे कोरडी पडली आहेत.
तज्ञांच्या मते, नैसर्गिक पुनर्भरणाच्या तुलनेत दरवर्षी 44 दशलक्ष घनमीटर अधिक पाणी काढले जात आहे, ज्यामुळे काबूलच्या लाखो लोकांना पाण्याचा तुटवडा भेडसावू शकतो. "पाणी संपल्यास लोकांना त्यांचे रहिवासी भाग सोडावे लागतील," असे मेर्सी कॉर्प्सच्या अफगाणिस्तान देश संचालक डेयन करी यांनी सांगितले.
पाण्याचा तुटवडा तर आहेच पण काबूलमधील जवळजवळ 80 टक्के भूमिगत पाणी मलनिस्सारण, खारटपणा आणि आर्सेनिक या विषारी पदार्थांनी दूषित झाले आहे. ज्यामुळे ते पिण्यासाठी सुरक्षित नाही. अनेक घरांना पाणी मिळवण्यासाठी त्यांच्या उत्पन्नाचा 30 टक्के भाग खर्च करावा लागतो आणि त्यातही अनेक जण कर्ज घेऊन पाणी घेत आहेत.
2001 मध्ये काबूलची लोकसंख्या 10 लाख होती. ती आता सत्तर लाखांवर पोहचली आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी आणि वापरही वाढला आहे. याशिवाय, शासनाच्या कमकुवत नियमनामुळे खासगी कंपन्यांना बोरिंग, विहिरी खोदण्यास व त्यामुळे पाणी महागात विकण्यास सढळ हाताने परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पाण्याच्या किंमती वाढून नागरिकांवरील संकट आणखी वाढले.
अफगाणिस्तानमध्ये 2021 पासून आंतरराष्ट्रीय देणगीदारांनी बिलियन डॉलर्सची मदत थांबवली आहे. ज्यामुळे मानवीय मदत कार्यक्रम कमी झाले आहेत. “तात्पुरते उपाय पुरेसे नाहीत. दीर्घकालीन गुंतवणूक आणि राजकीय इच्छाशक्ती आवश्यक आहे, नाहीतर आणखी मोठा आपत्तीचा सामना करावा लागेल,” असे डेयन करी यांनी म्हटले आहे.
जगातील अनेक शहरे भूजल संपण्याच्या काठावर आहेत.
चेन्नई- भारतातील चेन्नईत भूजलाचा स्तर फार कमी झाला आहे, त्यामुळे अनेक वेळा शहराला पाणी तुटवड्याचा सामना करावा लागला आहे.
साओ पाउलो- ब्राझीलमधील साओ पाउलोमध्ये 2014 मध्ये भूजल टंचाईमुळे मोठे संकट आले होते. शहरातील जलस्रोत कमी झाल्यामुळे लोकांच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला.
कॅलिफोर्निया- अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या अनेक भागांमध्ये, विशेषतः Los Angeles आणि San Joaquin Valley मध्ये भूजलाचा स्तर खूप खाली गेला आहे. दीर्घकालीन दुष्काळ आणि अधिक वापरामुळे हा प्रश्न गंभीर झाला आहे.
दुबई- युनायटेड अरब एमिरेट्समधील दुबईसारख्या दुर्गम आणि वाळवंटीय भागात नैसर्गिक पाण्याचा स्रोत कमी असल्याने भूजलावर अवलंबित्व जास्त आहे, पण तेही फार कमी झाले आहे.
क्वेझिन- चीनमधील क्वेझिन आणि इतर अनेक भागांमध्ये अत्यधिक भूजल वापरामुळे जमिनीची पातळी खाली आली आहे आणि भूजल संपण्याचा धोका वाढला आहे.
मेक्सिको सिटी- येथील भूजल पातळी खूप खाली आली असून, शहराच्या वाढत्या लोकसंख्येमुळे हा प्रश्न गंभीर बनला आहे.
जयपूर- भारतातील जयपूरमध्ये भूजल संपण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर आहे.
2017-2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनला जगातील सर्वात गंभीर पाणी तुटवडा भेडसावला होता, ज्याला “Day Zero” (दिवस शून्य) म्हणतात. या दिवशी शहरातील पाणी पुरवठा पूर्ण थांबण्याची भीती होती, म्हणजेच लोकांना घरी नळाचे पाणी मिळणं थांबेल आणि लोकांना अत्यंत मर्यादित पाण्यासाठी केंद्रावर जावे लागेल असं होणार होतं.
दरम्यान, केपटाऊन आता या संकटातून बऱ्यापैकी बाहेर पडले आहे. पण येथे पाणी व्यवस्थापन, जागरूकता आणि जलस्रोतांच्या शाश्वत वापरावर अजूनही भर दिला जात आहे.