घरबसल्या तयार करू शकता आधार कार्ड… जाणून घ्या

घरबसल्या तयार करू शकता आधार कार्ड… जाणून घ्या

युनिक आयडेंटिफेकेशन अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) आधार कार्डधारकांना घरपोच सेवा देण्याची तयारी केली आहे. यामुळे लोक घरातच बसून आधार कार्ड तयार करणे, फोन नंबर, पत्ता, नाव, बायोमेट्रिक आणि अन्य बदल करू शकतात. त्यासाठी पोस्टमनना प्रशिक्षण दिले जात आहे.

  • आधार अपडेटची प्रक्रिया सोपी करण्याचा प्रयत्न.
  • आधारशी मोबाईल क्रमांक लिंक असणे गरजेचे.
  • इंडिया पोस्ट पेमेंट बँकेतील 4 हजार 800 पोस्टमनना प्रशिक्षण.
  • प्रशिक्षणानंतर पोस्टमन थेट घरीच देतील सेवा.
  • पोस्टमनना डिजिटल गॅझेटस् मिळणार.
  • 2019 मध्ये घालून दिल्या होत्या नाव, जन्म तारीख आणि लिंग बदलासाठी काही मर्यादा.
  • आता बायोमेट्रिक अपडेटसाठी 100 रुपये, तर रंगीत आधार कार्डसाठी 30 रुपये मोजावे लागणार.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news