पुणे, पुढारी वृत्तसेवा: सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील संशयित संतोष जाधवच्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुजरात राज्यातून मुसक्या आवळल्या आहेत. यावेळी त्याच्या अन्य एका साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले आहे. जाधवला 2021 मध्ये झालेल्या राख्या बाणखेले याच्या खून प्रकरणी मंचर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याती मोक्कात अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या आठवड्यात सौरभ महाकाळ याला अहमदनगर जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.
जाधवला रविवारी रात्री उशिरा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आलं. 20 जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. दोन वर्षापासून खून केल्यानंतर संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ फरार झाले होते. हे दोघे ही लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीमधले असल्याचे समोर आलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांना सीसीटीव्ही पाहून त्यांची माहिती सांगितली होती.
मुसेवाला याच्यावर हल्ला करण्याकरता बिश्नोई गँगने महाराष्ट्र राज्यातून दोन शार्प शूटर बोलावल्याचा पंजाब पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पंजाब पोलीस तपास करत आहेत. संतोष जाधव आणि महाकाल नावाचे हे दोन शूटर असल्याचे बोलले जाते आहे. ज्यांनी मुसेवालावर गोळीबार केला, यांची नावे पंजाब पोलिसांनी जाहीर केली. मुसेवालांची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शूटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते.3 शूटर्स पंजाबमधील होते. 2 महाराष्ट्रातले, 2 हरियाणातले आणि यामधील एक शूटर्स हा राजस्थानमधील होता.
हेही वाचा