हैदराबाद : टॉप फॅशन डिझायनर प्रत्युषाचा मृत्यू संशयास्पद | पुढारी

हैदराबाद : टॉप फॅशन डिझायनर प्रत्युषाचा मृत्यू संशयास्पद

हैदराबाद : देशातील टॉप फॅशन डिझायनर प्रत्युषा गरिमेला (वय 35) यांचा मृतदेह त्यांच्या बंजारा हिल्समधील फिल्मनगर भागातील राहत्या घरात शनिवारी संशयास्पद स्थितीत आढळून आला. बेडरूममधून पोलिसांना कार्बन मोनॉक्साईडचे सिलिंडर आढळले आहे.

प्रत्यूषा देशातील पहिल्या टॉप 30 फॅशन डिझायनर्समध्ये समाविष्ट होती. कार्बन मोनॉक्साईडमुळेच प्रत्यूषा यांचा मृत्यू झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. सुरक्षा रक्षकाकडून या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली. प्रत्यूषा यांच्या घराचा दरवाजा पोलिसांना तोडावा लागला. प्रत्यूषा यांच्या दिल्लीत राहणार्‍या नातेवाईकांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे, असे पोलिसांनी सांगितले.

स्वत:च्या प्रत्यूषा गरिमेला या नावाने त्यांचा ब्रँड होता. बॉलीवूड आणि टॉलीवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसाठी त्यांनी फॅशन डिझायनिंग केले होते.

हेही वाचा :

 

Back to top button