पल्लवी बर्नवाल : “मी सेक्सवर बोलते, त्यांना वाटतं मी उपलब्ध आहे”

पल्लवी बर्नवाल ही सेक्सविषयी जागृती करण्यासाठी वर्कशाॅप घेते, फेसबुक लाईव्ह करते, पुस्तकं लिहिले, विविध माध्यमांमधून सदर लिहिते, लोकांचं काऊंन्सलिंग करते.
पल्लवी बर्नवाल या सेक्स एज्युकेटर आहेत.
पल्लवी बर्नवाल या सेक्स एज्युकेटर आहेत.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : आजही आपल्या समाजात सेक्स आणि सेक्सबद्दलची चर्चा ही खुलेपणाने केली जात नाही. ज्यावेळी एखादा यावर बोलतो, त्यावेळी लोकांच्या भुवया उंचावल्या जातात. यावर परखड भाष्य करत, सेक्सबद्दल जागृत करणारी पल्लवी बर्नवाल काही रुढीवादी मुद्दे उपस्थित करते. पल्लवी तिचं आयुष्य तिच्या मनासारखं जगते. तिला जसं हवं आहे, तसं ती जगते. कार्पोरेट सेक्टरची नोकरी सोडून तिने सेक्सबद्दलच्या जागृतीसाठी वाहून घेतलं आहे. तिच्या जगण्याची एक महत्वाचा पार्ट म्हणून ती सेक्सविषयी जागृती करत आहे.

पल्लवी बर्नवाल ही सेक्सविषयी जागृती करण्यासाठी वर्कशाॅप घेते, फेसबुक लाईव्ह करते, पुस्तकं लिहिले, विविध माध्यमांमधून सदर लिहिते, लोकांचं काऊंन्सलिंग करते. 'Sex Is… Memoir of a Woman's Sexuality', या पुस्तकात पल्लवी म्हणते की, "सेक्सविषयी आपल्या देशात मूठभर महिला जागृत झालेल्या आहेत. आजही सेक्स विषयावर खुलेपणाने चर्चा करायला तयार होत नाहीत. कारण, त्यांना ट्रोल आणि टीकेची भीती वाटते." त्यामुळे पल्लवीने स्त्रीयांच्या लैंगिकतेवर काम करते आहे.

पल्लवी म्हणते की, "मी सेक्स एज्युकेटर होण्यासाठी कोणताही प्लॅन केलेला नव्हता. मी सुरुवातीला माझे विचार व्यक्त करण्यासाठी ब्लाॅग लिहायला सुरूवात केली. कवितेच्या माध्यमातून मी व्यक्त होऊ लागले. एकदा मित्र म्हणाला की, तुम्हाला लिहिण्यापासून कोण रोखतं आहे, लिहा तुम्ही."

"त्यानंतर माझ्या सेक्सलेस लग्नाविषयी (संभोगाशिवास लग्न) आणि तो मास्टरब्युटिंग (हस्तमैथून) करून घालवलेला आठवडा, यावर मी एक कथा लिहिली. ही कथा वाचून अनेक स्त्री-पुरुषांच्या प्रतिक्रिया आल्या. तुमच्यासारखा अनुभव मलाही आला. पण, तुमच्यासारखं आम्हाला व्यक्त होता येत नाही. कारण, तथाकथीत सामाजिक नियमांची भीती वाटते."

पल्लवी पुढे सांगते की, "यानंतर मी सेक्सवर लिहायला सुरूवात केली. लोकांच्या ज्या पद्धतीने प्रतिक्रिया यायला सुरूवात केली, त्यावरून विचार केला आणि ठरवलं की, आपल्याला यावर काहीतरी हवं. लोकांच्या मनात सेक्सबद्दल सेक्सबद्दल जो गोंधळ आहे, तो दूर करायला हवा", असंही पल्लवी एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत सांगते.

"माझ्या काळात सेक्सबद्दलच्या ज्या काही कल्पना होत्या, त्या आजही तशाच आहेत.लग्नापूर्वीचा सेक्स, विवाहबाह्य सेक्स या गोष्टींबद्दल आजही समाजतात भीती आहे. सेक्सलेस विवाह मोठ्या प्रमाणात आहेत. कारण, त्या विवाहातील दोघांपैकी एका सेक्स ही घृमास्पद गोष्ट वाटते. एक सेक्स एक्स्पर्ट म्हणून मला वाटते की, मानवी अस्तित्वाची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सेक्स होय. त्यामुळे माझं ध्येय हे समाजात याविषयी जागृकता घडवून आणणे आणि लोकांना सेक्सविषयीचे विचार स्वीकारण्याची मानसिकता तयार करणे", असंही पल्लवी बर्नवाल सांगते.

"पुरुषप्रधान संस्कृतीत लैंगिक दडपशाही मोठ्या प्रमाणात आहे. तिथं लैंगिक शिक्षणाचा अभाव आढळतो. सेक्सकडे निर्णयाधारित दृष्टीकोनातून पाहिलं जातं. पाॅर्न ही लैगिंक शिक्षणाची आणि आनंद मिळण्याची प्रथम सामग्री आहे. इथं संमती नावाची बाबच शिल्लक नाही. आता माझ्या व्हिडीओला पुरुषांच्या हिट्स जास्त मिळतात. कारण, पाहणाऱ्या पुरुषांना असं वाटतं की मी सेक्सवर बोलते, याचा अर्थ मी त्यांच्यासोबत सेक्स करायला तयार आहे. दुर्दैव असं आहे की, संपूर्ण जगभरात 'सेक्स' हा शब्द जरी वाचला तरी, निषिद्ध समजलं जातं. त्यामुळे आपण सेक्स शिक्षण आणि सेक्सबद्दलची विनंती फरक करू शकत नाही", असंही परखड मत पल्लवी बर्नवाल मांडते.

"मी सेक्सवर बोलते म्हणजे मी सेक्ससाठी उपलब्ध आहे, असा निष्कर्ष मला फाॅलो करणारे पुरुष काढतात. हे असे पुरूष सेक्सलेस विवाहित असतात किंवा ते स्त्रीला एक वस्तू म्हणून पाहतात. मी सोशल मीडियाची खूप आभारी आहे. कारण, अशा माणसांना ब्लाॅक करण्याचा आणि इनबाॅक्स क्लिन करण्याचा पर्याय दिला आहे. नंतर लक्षात आले माझ्या की, अशा माणसांना मी बदलू शकत नाही. त्यापेक्षा जी माणसं शिकण्याच्या आणि बदलण्याच्या मनस्थितीत अशा लोकांवर मी केंद्रीत करते", असं पल्लवी सांगते.

"कामसूत्र ही भारताची उत्पत्ती आहे, मानवी लैंगिकतेवर पहिल्यांदा लिहिलं गेलेलं जगातलं पहिलं पुस्तक आहे. समाधानकारक वैवाहिक जीवनासाठी जास्त महत्व देणारं हे पुस्तक आहे. सेक्सवर बोलण्याची माणसाला भाषाच दिली नाही, त्यामुळे आपण सेक्सवर बोलतच नाही. मुलांना शरीराचे अवयव माहीत असतात, पण गुप्तांना काय म्हणायचे हेच माहिती नाही. मला खात्री आहे की, संवादातून, उदाहणांतून लैंगिगतेबद्दलची समज का आणि कशी निर्माण झाली, याबद्दल एक आदर्श माॅडेल तयार करू", असं पल्लनी सांगते.

पल्लवी शेवट करताना असं म्हणते की, "जेव्हा लैंगिक कल्पना आणि इच्छा दडपल्या जातात, लैंगिक जिज्ञासा पूर्ण करण्याचे मार्ग बंद केले जातात, तेव्हा त्याचा परिणाम माणसाच्या संपूर्ण आयुष्यावर होतो. जीवनाचं समाधान मिळू शकत नाही. हे कायमच राहणार आहे. पण, मी या अव्यक्त लैंगिकतेला आवाज देत आहे."

पहा व्हिडीओ : पुण्यातील ओशो आश्रमाचा गैरव्यवहार भक्तांनी आणला चव्हाट्यावर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news