पोस्टाद्वारे निर्यात होणाऱ्या वस्तूंवर कर कपात | पुढारी

पोस्टाद्वारे निर्यात होणाऱ्या वस्तूंवर कर कपात

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

भारतीय पोस्ट सेवेद्वारे विविध वस्तूंची बाहेरील देशांमध्ये नियिमितपणे निर्यात होत असते.विशेषत: देशातील तंतुवाद्यांची मोठ्या प्रमाणत निर्यात केली जाते. सांगली जिल्ह्यातील मिरज आणि तंजावर व वाराणसी शहरांमध्ये तयार होणारी ही तंतुवाद्ये इंग्लंड, बेल्जियम व अन्य युरोपियन देशांमध्ये निर्यात केली जातात.पंरतु, मध्यंतरी पोस्ट विभागाने निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंच्या वजनाऐवजी आकारमानाच्या आधारावर निर्यात शुल्क आकारण्यास सुरुवात केली होती. या निर्णयामुळे भारतीय तंतुवाद्य निर्मात्यांचा व्यवसाय जवळजवळ ८०% कमी झाला होता.

मिरजेतील पारंपारिक वाद्य निर्मात्यांना मिळणार दिलासा

ही मोठी समस्या लक्षात घेऊन मिरजेतील पारंपारिक वाद्य निर्मात्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यसभा सदस्य आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ.विनय सहस्रबुद्धे यांनी नुकतीच केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री देवूसिंह चौहान यांच्या माध्यमातून पोस्ट खात्याचे महासंचालकांची यांची भेट घेतली. ही जाचक अट मागे घेण्याची मागणी या वेळी केली होती. या मागणीची गंभीर दखल घेत पोस्ट खात्याच्या महासंचालकांनी सकारात्मक कारवाईचे आश्वासन दिले होते. याच आश्वासनाला अनुसरून दूरसंचार मंत्रालयाने एक परिपत्रक प्रकाशित केले आहे, ज्याद्वारे केवळ तंतुवाद्यच नव्हे तर निर्यात होणाऱ्या कोणत्याही वस्तूचे पूर्वीप्रमाणेच वाहन मोजून निर्यात शुल्क आकारण्याचे निर्देश दिले आहेत.

‘पोस्ट खात्याद्वारे निर्यात होत असलेल्या वस्तूच्या आकारमानावरुण निर्यात शुल्क आकारण्यात येत असल्याने भारतीय तंतुवाद्य निर्मात्यांचे मोठे नुकसान होत होते.कारण रुद्रवीणा,दिलबहार सारखी तंतुवाद्ये आकारमानाने मोठी असतात.या वाद्यांच्या निर्यातीद्वारे भारताची सांगीतिक परंपरा जगभरात पोहोचते आणि सांस्कृतिक संबंध प्रस्थापित होतात.त्या दृष्टिकोनातून आधीच लुप्त होत असलेली कला जोपासण्यासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या वतीने आम्ही या विषयात नितीगत दखल घेण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत निर्यात शुल्क आकारण्याची पद्धत पूर्ववत केल्याबद्दल खासदार सहस्त्रबुद्धे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संचार मंत्री अश्विनी वैष्णव आणि देवूसिंह चौहान यांचे आभार मानले आहेत.या निर्णयामुळे पारंपारिक वाद्यनिर्मात्या कुटुंबांना दिलासा मिळाला आहे, असे विश्वास त्यांनी व्‍यक्‍त केला.

 

 

 

 

Back to top button