नुपूर शर्मांचे वादग्रस्‍त विधान : ‘अल कायदा’ने दिली हल्‍ल्‍याची धमकी

नुपूर शर्मांचे वादग्रस्‍त विधान : ‘अल कायदा’ने दिली हल्‍ल्‍याची धमकी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी  केलेल्या वादग्रस्त विधानाचे पडसाद जगभरात उमटत आहेत. आता अल-कायदा इन द इंडियन सब-कॉन्टिनेंट (AQIS) या दहशतवादी संघटनेने दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मुंबईमध्ये आत्‍मघाती हल्‍ले करण्‍याची धमकी दिली आहे.

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेले वादग्रस्‍त विधानावर कतार, कुवेत, इराण या देशांसह इस्लामिक कोऑपरेशन या आंतरराष्ट्रीय संघटनेने जोरदार आक्षेप घेतला आहे.  याप्रकरणी AQIS ने तर आता भारताला धमकीच दिली आहे.

यूएनच्या अहवालानुसार, AQIS अफगाणिस्तानातील निमरोज, हेलमंड आणि कंदाहार प्रांतातून तालिबानच्या अंतर्गत कार्यरत आहे. अ संघटनेचे बांगलादेश, भारत, म्यानमार आणि पाकिस्तानमधील 150 ते 200 सदस्य आहेत. भाजपच्या प्रवक्त्याच्या वादग्रस्त विधानावर   पाकिस्तानी तालिबान या संघटनेनेही धमकी दिली आहे.

दहशतवाद्यांवर लक्ष ठेवणाऱ्या फ्लॅश पॉईंट या संस्थेचे संस्थापक इवैन कोलमैन यांनी ट्विटमध्ये अल-कायद्याने भारताला धमकी देणारा एक संदेश जारी केला असल्याचे म्हटले आहे. दहशतवाद्यांवर नजर ठेवणाऱ्या SITE Intelligence Group या वेबसाइटनेही याबाबत माहिती दिली आहे. "अल-कायदाने अपमानाचा बदला घेण्यासाठी भारतात कहर करण्याची धमकी दिली आहे," असे वेबसाइटने म्हटलं आहे.

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news