१, २, ५, १० आणि २० रुपयांच्या नवीन नाण्यांची पंतप्रधान मोदींकडून घोषणा | पुढारी

१, २, ५, १० आणि २० रुपयांच्या नवीन नाण्यांची पंतप्रधान मोदींकडून घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाच्या आयकॉनिक वीक सोहळ्याचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी १, २, ५, १० आणि २० रुपयांच्या नवीन नाण्यांची श्रृंखला जारी केली. ही नाणी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित करण्यात आली आहेत.

वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयकडून 6 ते 11 जून दरम्यान “आझादी का अमृत महोत्सव” अंतर्गत आयकॉनिक सोहळ्याचे आयोजन केले आहे. या सोहळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आले. तसेच 1, 2, 5, 10, 20 रुपयांच्या नाण्यांचे अनावरणदेखील पंतप्रधांनांनी यावेळी केले. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, नवीन नाणी लोकांना सतत अमृत महोत्सवाच्या ध्येयांची आठवण करून देतील आणि राष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी प्रेरित करतील.

हेही वाचलंत का? 

Back to top button