

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी अवमानकारक विधान केले हाेते. याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
एका वृत्तवाहिनीच्या चर्चेवेळी नुपूर शर्मा यांनी प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल अवमानकारक विधान केले होते. आम्ही सर्व धर्मांचा आदर करतो. कोणत्याही धर्माचा अवमान आमच्या पक्षात केला जात नाही, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पक्षाकडून निलंबन करण्यात आल्यानंतर नुपूर शर्मा यांनी माफी मागितली आहे.
मी व्यक्त केलेल्या मतामुळे कोणच्या धार्मिक भावना दुखावला असतील तर मी माझे शब्द मागे घेते, असे नुपूर शर्मा यांनी म्हटलं आहे. भाजपचे महासचिव अरूण सिंग याबाबत सांगितले की, आमचा पक्ष सर्व धर्मांचा सन्मान करतो. नुपूर शर्मा यांनी केलेल्या व्यक्तव्य योग्य नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.