१४ ऑगस्ट फाळणी स्मृती दिवस पाळला जाईल : पीएम मोदी | पुढारी

१४ ऑगस्ट फाळणी स्मृती दिवस पाळला जाईल : पीएम मोदी

नवी दिल्ली ; पुढारी वृत्‍तसेवा :   ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळण्याच्या एक दिवस आधी १४ ऑगस्ट १९४७ रोजी देशाची फाळणी झाली होती. फाळणीची पीडा कधीही विसरली जाऊ शकत नाही, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सोशल मीडियावरून आपले दुःख व्यक्त केले. स्वातंत्र्य दिनाच्या एक दिवस आधी ‘फाळणी स्मृती दिवस’ पाळला जाईल, अशी घाेषणाही त्‍यांनी केली. ‘फाळणी स्मृती दिवस’ माध्‍यमातून देशातील ऐक्‍य आणि मानवीय संवेदनादेखील मजबूत होतील, असा विश्‍वासही त्‍यंनी व्‍यक्‍त केले.

फाळणीमुळे लाखो बंधू-भगिनींना विस्थापित व्हावे लागले तर असंख्य लोकांना प्राण गमवावे लागले होते, असेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

देशाची झालेली फाळणी ही पीडा कधीही विसरली जाऊ शकत नाही. द्वेष आणि हिंसाचारामुळे लाखो लोकांना विस्थापित व्हावे लागले, तर असंख्य लोकांची प्राणाहूती पडली.

भेदभाव, वैमनस्य आणि दुर्भावनेचे विष संपविण्यासाठी आजचा दिवस प्रेरित करेलच; पण यामुळे एकता, सामाजिक सद्भाव आणि मानवीय संवेदनादेखील मजबूत होतील, अशी आशा आहे, असा विश्‍वासही नरेंद्र माेदी यांनी व्‍यक्‍त केला आहे.

पहा व्हिडिओ : पुण्याच्या निकीताने केला भरतनाट्यममध्ये वर्ल्ड रेकॉर्ड

Back to top button