Uttar Pradesh Crime: मूकबधिर तरुणीवर गँगरेप, नराधमांपासून सुटकेसाठी पीडिता रस्त्यावरुन पळत होती; CCTV फुटेज समोर

२२ वर्षीय एका मूकबधिर तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आलीय
Uttar Pradesh Horror
Uttar Pradesh Horror (fIle photo)
Published on
Updated on

Uttar Pradesh Deaf Mute Women Assault Case:

बलरामपूर : उत्तर प्रदेशमधील बलरामपूर जिल्ह्यातील देहात कोतवाली परिसरात सोमवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. यामुळे हा संपूर्ण परिसर हादरला. येथे एका २२ वर्षीय मूकबधिर तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली. या घटनेपूर्वी ११ ऑगस्टच्या रात्रीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात पीडित तरुणी स्वतःला वाचवण्यासाठी रस्त्यावर धावत असून मागून तिचा अनेक दुचाकीस्वार पाठलाग करत असल्याचे दिसते. मन हेलावून टाकणारी ही घटना आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री शेतात पीडित तरुणी रडताना आढळून आली. याबाबत जवळील लोकांनी तात्कळ पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर तिला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तिच्या कुटुंबीयांनी तिच्यावर सामूहिक बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी दोघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. अंकुर वर्मा (वय २१) आणि हर्षित पांडे (२२) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी संशयितांना पाठलाग करुन पकडले. यादरम्यान संशयित जखमी झाले.

Uttar Pradesh Horror
पतीमध्ये शुक्राणूंची संख्या कमी, म्हणून गर्भधारणेसाठी सासऱ्यानेच केला सुनेवर बलात्कार

पीडितेच्या कुटुंबीयांच्या माहितीनुसार, ती सोमवारी सकाळी तिच्या मामाच्या घरी गेली होती. मामाचे घर तिच्या घरापासून सुमारे १ किमी अंतरावर आहे. याच दिवशी ती सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ती घरी परतण्यासाठी निघाली. पण बराच वेळ झाला तरी घरी परतली नाही. यामुळे कुटुंबीयांना तिची काळजी वाटली. त्यांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. पण ती त्यांनी कुठेही सापडली नाही. रात्री उशिरा ती एका शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आली.

सीसीटीव्ही फुटेज आले समोर

या घटनेपूर्वीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडित तरुणी रस्त्यावरून धावत असून पाच ते सहा तरुण दुचाकीवरून तिचा पाठलाग करत असल्याचे दिसते. ही संपूर्ण घटना एसपी निवासस्थानाजवळ असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पीडितेला बोलता आणि ऐकू येत नाही. या घटनेनंतर तिला मोठा मानसिक धक्का बसला आहे. या घटनेबाबत पीडितेने काही माहिती हावभावांद्वारे सांगितली. दरम्यान, तपासात मदतीसाठी तज्ज्ञांना बोलावण्यात आले आहे. "आम्ही मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. संशयितांच्या मोटारसायकलींचे क्रमांक सापडले आहेत. त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची पथके तयार करण्यात आली," अशी माहिती पोलीस अधीक्षक विकास कुमार यांनी दिली.

Uttar Pradesh Horror
DRDO चा व्यवस्थापकच निघाला ISI चा एजंट, क्षेपणास्त्रांची गोपनीय माहिती दिली पाकिस्तानला

आरोपींचा पोलिसांवर गोळीबार, पण अखेर त्यांना पकडले

मंगळवारी रात्री, दोन संशयितांची नावे समोर आली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना पकडण्यासाठी अलर्ट जारी केला. बुधवारी पहाटे सुमारे १२:३० वाजण्याच्या सुमारास संशयित कोतवाली देहात पोलिस स्थानकाच्या बाहेरील परिसरात दिसून आले. ते नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्नात होते. पण पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांवर गोळीबार केला. त्याला पोलिसांनी चोख प्रत्युत्तर दिले. यात संशयित जखमी झाले. त्यानंतर, दोन्ही संशयित पोलिसांना शरण आले आणि गुन्ह्याची कबुली दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news