Target killing : जम्मू-काश्मीरमध्ये बँक व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या | पुढारी

Target killing : जम्मू-काश्मीरमध्ये बँक व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या

पुढारी ऑनलाईन डेस्क : जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये काश्‍मीरी पंडित शिक्षिकेच्‍या हत्‍येची घटना ताजी असतानाच आज (दि.२) दहशतवाद्यांनी बँक व्यवस्थापकाची गोळ्या झाडून हत्या (Target killing) केली.  विजयकुमार असे त्‍यांचे नाव असून, ते मूळचे राजस्थानमधील हनुमानगडचे रहिवासी आहेत.

कुलगाम जिल्ह्यातील आरेह मोहनपोरा येथील स्थानिक देहाती बँकेत दहशतवाद्यांनी बँक व्यवस्थापकावर गोळीबार  (Target killing) केला. ते गंभीर जखमी झाले. त्‍यांना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले मात्र उपचारापूर्वीच त्‍यांचा मृत्‍यू झाल्‍याचे डाॅक्‍टरांनी जाहीर केले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिसराची नाकेबंदी केली आहे.

७ मे रोजी जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी एका पोलिसाला गोळ्या घालून जखमी केले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, शहरातील सफाकदल भागातील ऐवा पुलाजवळ सकाळी ८.४० च्या सुमारास दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलवर गोळीबार केला होता. या हल्ल्यात पोलीस गंभीर जखमी झाला होता. या हल्ल्यानंतर परिसराची नाकेबंदी करत हल्लेखोरांना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली होती. दरम्यान, आज एका बँका अधिकाऱ्याची हत्या झाल्याने सुरक्षे व्यवस्थेपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button