व्वा रे पठ्ठे…! अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन! | पुढारी

व्वा रे पठ्ठे...! अहिल्यादेवींच्या जयंतीदिनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन!

बारामती : पुढारी वृत्तसेवा

अंजनगाव (ता. बारामती) येथील सोमेश्वर विद्यालयात शिक्षकांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या फोटो ऐवजी सावित्रीबाई फुले यांचा फोटो ठेवून अहिल्यादेवी यांची जयंती साजरी केली आहे. या कार्यक्रमाचे फोटो सध्या सोशल मीडियावरून व्हायरल झाले. त्यानंतर हा प्रकार पुढे आला. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

गोविंदानंद सरस्वती दाव्यावर ठाम ; म्हणे, हनुमानाचे जन्मस्थळ ‘किष्किंधा’च

बारामती तालुक्यातील अंजनगाव येथील श्री सोमेश्वर विद्यालयात मंगळवारी (दि. 31 मे) अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक एम. डी. बाबर यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या वेळी शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनीदेखील प्रतिमेचे पूजन केले. मात्र अखेरपर्यंत कोणाच्याही लक्षात आले नव्हते की, आपण अहिल्यादेवींची जयंती साजरी करत असताना सावित्रीबाई फुले यांच्या फोटोची पूजा करीत आहोत. विशेष म्हणजे या सर्व कार्यक्रमाचे फोटो गावातील सोशल मीडियात व्हायरल झाले. त्यानंतर गावातल्या लोकांनी हा प्रकार पाहून संताप व्यक्त केला.

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी एकनाथ खडसेंना ईडीची नोटीस

हा सर्व प्रकार लक्षात आल्यानंतर मुख्याध्यापक बाबर यांनी चूक मान्य करत अनावधानाने हा प्रकार घडल्याचे सांगितले. मात्र, महापुरुषांमधील फरक लक्षात येऊ नये, एवढे शिक्षक अज्ञानी आहेत का, असा सवाल करत ग्रामस्थांनी त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. या सर्व प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव भारत खोमणे यांनी शाळेत धाव घेतली. पालक आणि शिक्षकांसमवेत घेतलेल्या बैठकीत या प्रकाराची गंभीर दखल घेत संबंधित मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर दोन दिवसांत अपेक्षित कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

Back to top button