कोरोनातून बऱ्या झालेल्या छोटा राजनची पुन्हा तिहार तुरुंगात रवानगी | पुढारी

कोरोनातून बऱ्या झालेल्या छोटा राजनची पुन्हा तिहार तुरुंगात रवानगी

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

कोरोना संसर्गातून बऱ्या झालेल्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची रवानगी पुन्हा एकदा तिहार तुरुंगात करण्यात आली आहे. 22 एप्रिल रोजी छोटा राजनला कोरोना झाल्याचे निदान झाले होते, त्यानंतर 24 एप्रिलला त्याला ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अर्थात एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. 

61 वर्षीय छोटा राजन कोरोनातून बरा झाला असून त्याची रवानगी पुन्हा तिहारमध्ये करण्यात आली असल्याची माहिती दिल्ली पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. एम्स रुग्णालयात उपचार सुरू असताना छोटा राजनचे निधन झाल्याची अफवा काही दिवसांपूर्वी उडाली होती. तिहार तुरुंगाचे महानिरीक्षक संदिप गोयल यांनी त्यानंतर छोटा राजनच्या मृत्यू झाला नसल्याचे स्पष्ट केले होते. 2015 साली छोटा राजनचे इंडोनेशियातून भारतात प्रत्यर्पण करण्यात आले होते. तेव्हापासून त्याला अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या तिहार तुरुंगातच ठेवण्यात आलेले आहे.

Back to top button