वादळी पावसामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी रद्द; इंटरनेट सेवा ठप्प | पुढारी

वादळी पावसामुळे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी रद्द; इंटरनेट सेवा ठप्प

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानी दिल्लीत झालेल्या वादळी पावसामुळे इंटरनेट सेवा ठप्प झाल्याचा फटका सर्वोच्च न्यायालयालाही बसला. अशात सर्वोच्च न्यायालयात व्हिडिओ कॉन्फरन्सवरून होणारी सुनावणी आज रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, कालांतराने इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली. दोन अवकाशकालीन खंडपीठ सुनावणी घेत आहेत. अशात इंटरनेटच्या असुविधेमुळे प्रत्यक्ष उपस्थित राहून सुनावणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

यासंबंधी रजिस्ट्रार (ओएसडी) एच.एस.जग्गी यांनी अधिसूचना काढली. शिवाय सर्वोच्च न्यायालयाच्या कॅम्प्यूटर सेलकडून वकिलांना देखील माहिती देण्यात आली होती. एनआयसीकडून न्यायालयाच्या डेटा सेंटरची इंटरनेट सेवा सोमवारी संध्याकाळी आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे बंद झाली आहे.

दुसऱ्या इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपनीचे इंटरनेट सकाळी ७ वाजल्यापासून बंद आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. एनआयसीचे पथक तांत्रिक समस्येची हाताळणी करीत सेवा पूर्ववत करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सकाळी सांगण्यात आले होते. मात्र, कालांतराने तांत्रिक अडचणी सोडवण्यात आली असून इंटरनेट सेवा बहाल करण्यात आल्याची माहिती कॅम्प्यूटर सेलने दिली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button