म्हसे (ता. पारनेर) : येथे कार्यालयाचा आमदार लंके यांच्या हस्ते लोकार्पण.
अहमदनगर
‘आपले घर भक्कम असताना दुसरीकडे जायची गरज काय’
जवळा : पुढारी वृत्तसेवा
म्हसे (ता. पारनेर) येथे राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियानअंतर्गत सुमारे 20 लाख रुपये खर्च करून ग्रामपंचायत कार्यालय इमारतीचा लोकार्पण सोहळा आमदार नीलेश लंके यांच्या उपस्थितीत पार पडला. तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष बाबाजी तरटे अध्यक्षस्थानी होते.
यावेळी तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी, आरोग्य या लोकांच्या मुलभूत गरजा सोडविण्यासाठी आपण विशेष करून प्रयत्न करणार आहे.
यावेळी सरपंच नीलम उदमले, उपसरपंच रखमाबाई एडकर, कारभारी पोटघन, बाळासाहेब पुंडे, सेवा संस्था अध्यक्ष संभाजी मदगे, अनिल मदगे, सरपंच डॉ. आबासाहेब खोडदे, आण्णा बढे, सुभाष खोसे, सरपंच बाळासाहेब खोसे, अरुण पवार, माजी सभापती सुदाम पवार, सरपंच बंडूजी साबळे, सुहास नगरे, रामदास इरोळे, पांडुरंग कारखिले आदी उपस्थित होते.

