

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : देशात बुधवारी दिवसभरात २ हजार ६२८ कोरोनाबाधितांची (corona) भर पडली. तर, १८ रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, २ हजार १६७ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. गुरूवारी देशाचा कोरोना मुक्तदर ९८.७५ टक्के आणि दैनंदिन कोरोनासंसर्गदर ०.५८ टक्के नोंदवण्यात आला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ४ कोटी ३१ लाख ४४ हजार ८२० पर्यंत पोहचली आहे. यातील ४ कोटी २६ लाख ४ हजार ८८१ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली आहे. तर, ०.०४ कोटी म्हणजेच १५ हजार ४१४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख २४ हजार ५२५ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
(corona affected) देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९२ कोटी ८२ लाख ३ हजार ५५५ डोस देण्यात आले आले आहेत. यातील ३.३३ कोटी पहिला डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आला. खबरदारी म्हणून ३ कोटी ३७ लाखांहून अधिक बूस्टर डोस देण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून आतापर्यंत १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पुरवण्यात आले आहेत. यातील १६ कोटी २७ हजार ८०५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८४ कोटी ८४ लाख ११ हजार ३५६ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ५२ हजार ५८० तपासण्या बुधवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?