नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : देशात गुरूवारी दिवसभरात २ हजार २५९ कोरोनाबाधितांची भर पडली. तर, २० रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान २ हजार ६१४ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७५ टक्के आणि दैनंदिन कोरोना संसर्गदर ०.५० टक्के नोंदवण्यात आला. देशातील ४ कोटी २५ लाख ९२ हजार ४५५ रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात मिळवली आहे. तर, १५ हजार ४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दुदैवाने आतापर्यंत ५ लाख २४ हजार ३२३ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला.
देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९१ कोटी ९६ लाख ३२ हजार ५१८ डोस देण्यात आले आहेत. यातील ३.२४ कोटी डोस १२ ते १४ वयोगटातील बालकांना देण्यात आले आहेत. तर, खबरदारी म्हणून ३ कोटी १९ लाख २० हजार ५९९ बूस्टर डोस लावण्यात आले आहेत.
केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ डोस पैकी १६ कोटी ७२ लाख ८५ हजार ९१० डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत. देशात आतापर्यंत ८४ कोटी ५८ लाख ५५ हजार ३५१ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ४ लाख ५१ हजार १७९ तपासण्या गुरूवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.
हेही वाचलंत का ?