निठारी हत्याकांड : क्रर सुरिंदर कोळीला सीबीआय न्यायालयाकडून फाशीची शिक्षा | पुढारी

निठारी हत्याकांड : क्रर सुरिंदर कोळीला सीबीआय न्यायालयाकडून फाशीची शिक्षा

गाझियाबाद; पुढारी ऑनलाईन : निठारी हत्याकांड प्रकरणातील क्रुर मुख्य आरोपी सुरिंदर कोळीला गाझियाबाद येथील विशेष सीबीआय न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. सुरिंदरविरोधात अनेक खुनाचे आरोप आहेत.

न्यायाधीशांनी त्याला कामावर ठेवणाऱ्या मोनिंदर सिंग पंधेरला सात वर्ष जेलची शिक्षा सुनावली आहे. सुरिंदर सिंगला ६२ हजार, तर पंधेरला ४ हजारांचा दंड ठोठावला आहे.

नोएडा पोलिसांना आरोपीच्या घरामागील नाल्यात मानवी अवशेष सापडल्यानंतर सोळा वर्षांपूर्वी ही खळबळजनक हत्या उघडकीस आली होती. आरोपी कोळी आणि पंधेर यांच्यावर सध्या अनेक जणांवर बलात्कार आणि खुनाचे गुन्हे दाखल आहेत.

संबंधित बातम्या

सीबीआयने या प्रकरणात तपास हाती घेतल्यानंतर १६ प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल केले होते. कोळीवर खून, बलात्कार, कट रचणे आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोपात दोषी आढळला. पंधेर अनैतिक तस्करीमध्ये आरोपी होता. कोळीला यापूर्वी १० हून अधिक प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. पंढेरलाही तीन प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा झाली आहे.

दोन्ही आरोपींना २९ डिसेंबर २००६ रोजी अटक करण्यात आली होती. निठारीमधील डी-५ घराच्या बाजूच्या नाल्यात गायब झालेल्या मुलीचे अवशेष आणि इतर वस्तू सापडल्यानंतर त्यांना अटक केली होती. कोळीवर अनेक मुलींची हत्या केल्याचा आरोप आहे. त्याचबरोबर घराच्या बाजूच्या नाल्यात शरीराचे तुकडे करून फेकून देत होता.

हे ही वाचलं का ?

Back to top button