पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (एएसआय) खात्याला कुतुबमिनार परिसरात उत्खनन करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. के. रेड्डी (G. K. Reddy) यांनी रविवारी (दि.२२) फेटाळून लावले आहेत. असा कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असे त्यांनी सांगितले.
ज्ञानवापी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर असे वृत्त समोर आले होते की, सांस्कृतिक मंत्रालयाने पुरातत्व खात्याला कुतुबमिनार परिसरात उत्खनन करण्याचे आदेश दिले आहेत. कुतुबमिनारमधील पुतळ्यांचा अभ्यास करण्याचे आदेशही दिल्याचे वृत्तात म्हटले होते. परंतु याबाबत खुलासा करत रेड्डी (G. K. Reddy) यांनी असे कोणतेही आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, कुतुबमिनार परिसराचे खोदकाम करून या भागाचे सत्य शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कुतुबमिनारबाबत (Qutub Minar) अनेक दावे आणि प्रतिदावे आहेत. आक्रमककर्त्यांनी २७ हिंदू व जैन मंदिरांची तोडफोड करून कुतुबमिनार बांधल्याचे सर्वसाधारणपणे मानले जाते. तशा उल्लेखाचा एक फलकदेखील या भागात आहे. दुसरीकडे पुरातत्त्व खात्याच्या एका अधिकाऱ्याने अलीकडेच आचार्य वराहमिहिर यांच्या नेतृत्वाखाली हा परिसर बांधण्यात आल्याचा दावा केला होता. कुव्वत-उल-इस्लाम मशिदीवरूनही वाद आहे.
कुतुबमिनार परिसरातील मूर्तींची लवकरच इन्कोग्राफी केली जाणार आहे. यानंतर एएसआय आपला अहवाल सांस्कृतिक कार्य मंत्रालयाला सोपवेल. कुतुबमिनारच्या दक्षिणेला तसेच मशिदीपासून १५ मीटर अंतरावर लवकरच खोदकाम सुरु केले जाणार आहे. याशिवाय अनंगताल आणि लालकोट किल्ल्यावर खोदकाम होणार आहे. कुव्वत-उल-इस्लाम मशिदीवर लावण्यात आलेल्या हिंदू मूर्तींची माहिती देण्यासाठी नोटीस बोर्ड लावला जाणार आहे. अशा प्रकारचे वृत्त समोर आले होते. परंतु रेड्डी यांनी हे वृत्त फेटाळून लावत पुरातत्व खात्याला कोणतेही आदेश दिले नसल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचलंत का ?