कोरोनाचे देशात २२२६ नवे रुग्ण; ६५ जणांचा मृत्‍यू | पुढारी

कोरोनाचे देशात २२२६ नवे रुग्ण; ६५ जणांचा मृत्‍यू

पुढारी ऑनलाईन डेस्क :  कोरोना रुग्णसंख्येमधील चढउतार सुरुच आहे. देशात सलग चौथ्या दिवशीही २००० पेक्षा अधिक नवे  रुग्ण आढळले. मृतांची संख्या अडीच पट वाढल्याने  चिंतेची बाब ठरली आहे. रविवारी दिनांक २२ मे रोजी आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनूसार देशात २४ तासात रुग्णसंख्येत २२२६ नवे रुग्ण सापडले आहेत.  ६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी दिनांक २१ मे रोजी कोरोनाचे २२३२  रुग्ण आढळले; तर २५ लोकांचा मृत्यू झाला होता.

या जागतिक महामारीत आतापर्यंत  कोरोनाची ४,३१,३६,३७१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५ लाख २४ हजार ४१३ रुग्‍णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनूसार, मागील २४ तासांमध्‍ये काेराेनाचे  २२२६ नवे रुग्ण सापडले.  ६५ लोकांचा मृत्यु झाला आहे. त्यापैकी ६३ रुग्ण हे केरळचे आहेत. दिल्ली आणि उत्तर प्रदेशचा प्रत्‍येकी एकजण आहे.

सक्रीय कोरोना प्रकरणांमध्ये घट दिसून येत आहे. या २४ तासात कोरोना मृत्यू संख्येत ४१ रुग्णांची घट झाली आहे. तर रुग्ण संख्येत १५ हजार अशी घट होवून ती १४ हजार ९५५ वर आली आहे. आकडेवारीनूसार, कोरोना संसर्गचा दैनंदिन दर हा ०.५०% आहे. आणि साप्ताहिक संक्रमण दर ०.५०%  राहीला आहे. आजारातून बरे होण्याची संख्या ४,२५,९७,००३ आहे. मृत्यू दर १.२२%  नोंदवला आहे. देशव्यापी कोरोना निर्मूलन लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत १९२.२ कोटी लस देण्यात आल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button