पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताने गुरुवारी (दि.१९) ५ जी कॉलचे यशस्वी परीक्षण केले. केंद्रीय रेल्वे आणि संचार व तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, आयआयटी मद्रासमध्ये ५ जी चे यशस्वी परीक्षण करण्यात आले आहे. यामध्ये संपूर्ण नेटवर्क आणि डिझायन भारतातच तयार केले गेले आहे.
मंत्री वैष्णव यांनी ट्वीटच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. तसेच त्यांनी एक व्हिडिओ देखिल पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ५ जीचे परीक्षण करणाऱ्या टीम सोबत ते दिसत आहेत. मंत्री वैष्णव यांच्या सोबत संपूर्ण टीम आनंद व्यक्त करताना दिसत आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले, आयआयटी मद्रासच्या या टीमचा आम्हाला अभिमान व गर्व आहे. ज्यांनी ५ जी यंत्रणेला विकसित केले. यामुळे ५ जी डेव्हलपमेंट इकोसिस्टीम आणि हायपरलूप उपक्रमाला मोठ्या संधी उपलब्ध करुन देईल.