काळजी घेणे आवश्‍यक : मागील २४ तासांच्‍या तुलनेत कोरोना रुग्‍णसंख्‍येत २५ टक्‍के वाढ | पुढारी

काळजी घेणे आवश्‍यक : मागील २४ तासांच्‍या तुलनेत कोरोना रुग्‍णसंख्‍येत २५ टक्‍के वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
देशभरात कोरोना सक्रीय रुग्‍णसंख्‍या १९ हजार पार गेली आहे. आरोग्‍य मंत्रालयाच्‍या सूत्रांनी आज दिलेल्‍या आकडेवारीनुसार, देशभरात ३ हजार २०५ नवे रुग्‍ण आढळले आहेत. मागील २४ तासांच्‍या तुलनेत ही वाढ २५ टक्‍के अधिक आहे. सर्वाधिक ४० टक्‍के रुग्‍णवाढ ही दिल्‍ली येथील आहे. देशभरात ३१ रुग्‍णांचा मृत्‍यू झाला. दिलासादारक बाब म्‍हणजे, २४ तासांमध्‍ये २ हजार ८०२ रुग्‍णांना डिस्‍चार्ज मिळाला आहे. देशातील एकुण सक्रीय कोरोना रुग्‍णसंख्‍या १९ हजार ५०९ इतकी आहे.

दिल्‍लीतील रुग्‍णवाढ चिंताजनक

मागील २४ तासांमध्‍ये दिल्‍लीत कोरोनाचे १हजार ४१४ नवे रुग्‍ण आढळले. मागील काही दिवसांच्‍या तुलनेतील ही वाढ ३१ टक्‍के अधिक आहे. तर महाराष्‍ट्रात १८२ नवे रुग्‍ वाढले ओत. यातील मुंबई येथील रुग्‍णसंख्‍या १०० आहे,अशी महिती आरोग्‍य मंत्रालयाच्‍या सूत्रांनी दिली.

हरियाणामध्‍ये आजपासून कोरोना प्रतिबंधक बुस्‍टर डोस देण्‍यात येणार आहे. १८ ते ५९ वयोगटातील दोन डोस घेतलेल्‍या नागरिकांना बुस्‍टर डोस दिला जाणार आहे. मुख्‍यमंत्री मनोहर लाल यांनी २५ एप्रिल रोजी राज्‍यात बूस्‍टर डोस मोफत देण्‍यात येईल, अशी घोषणा केली होती.

हेही वाचा : 

 

Back to top button