माजी सनदी अधिकारी तरुण कपूर पंतप्रधानांचे नवे सल्लागार

माजी सनदी अधिकारी तरुण कपूर पंतप्रधानांचे नवे सल्लागार
Published on
Updated on

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

केंद्र सरकारने सोमवारी मोठे प्रशासकीय फेरबदल करीत माजी पेट्रोलियम सचिव तरूण कपूर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्लागार पदी नियुक्ती करण्‍यात आली आहे. तर  ज्ञानेश कुमार यांना सहकार सचिव, अलेकश कुमार शर्मा यांना सूचना तसेच माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिवपदी नियुक्‍ती झाली आहे.

केंद्रीय कार्मिक मंत्रालयाने सोमवारी प्रशासकीय फेरबदलाचे आदेश जारी केले. पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेले तरुण कपूर हे हिमाचल प्रदेश कॅडरच्या १९८७ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ३० नोव्हेंबर २०२१ रोजी तेल आणि प्राकृतिक गॅस मंत्रालयातून सेवानिवृत्त झाले होते.

कार्मिक मंत्रालयाने दिलेल्या माहितीनूसार, मंत्रीमंडळाच्या नियुक्ती समितीने पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून कपूर यांच्या नियुक्तीला मंजूरी दिली आहे. दोन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यापासून हा कार्यकाळ सुरू होईल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. वरिष्ठ आयएएस अधिकारी हरी रंजन राव आणि आतिश चंद्र यांना पीएमओ मध्ये अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. राव हे मध्य प्रदेश कॅडरचे १९९४ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या ते दूरसंचार मंत्रालयात यूनिवर्सल सर्विसेस ऑब्लिगेशन फंड चे प्रशासक आहेत. त्यांचेच बॅचमेट असलेले बिहार कॅडरचे आतिश चंद्र सध्या भारतीय खाद्य महामंडळाचे सीएमडी आहेत.

वरिष्ठ आयएएस अधिकारी ज्ञानेश कुमार यांना सहकार मंत्रालयाचे सचिव बनवण्यात आले आहेत. केरळ कॅडरच्या १९८८ बॅचचे ते अधिकारी आहेत. सध्या ते संसदीय कामकाज मंत्रालयात सचिव आहेत. देवेंद्र कुमार सिंह यांच्या जागी त्यांची बदली करण्यात आली आहे. सिंह यांना मनावाधिकार आयोगाचे महासचिव बनवण्यात आले आहेत. कॅबिनेट सचिवालयात सचिव समन्वय असलेले अलेकश कुमार शर्मा यांना माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार मंत्रालयाचे सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news