न्यायपालिकेची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर नियंत्रण आणा : ईलन सारस्वत | पुढारी

न्यायपालिकेची प्रतिमा मलीन करणाऱ्यांवर नियंत्रण आणा : ईलन सारस्वत

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : राजधानीतील धार्मिक दंगलग्रस्त जहांगीरपुरीतील ‘बुलडोझर’ कारवाईसंबंधी न्यायालयाने दिलेल्या आदेशावर टीका-टिप्पणी करणाऱ्या प्रसार माध्यमांसह समाजमाध्यमांवर नियंत्रण आणून त्यासंबंधी दिशानिर्देश जारी करण्याची मागणी करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे वकील ईलन सारस्वत यांनी सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांना पत्र लिहून ही मागणी केली. न्यायालयाच्या ‘जैसे थे’च्या आदेशानंतर समाज माध्यमांवरुन न्यायालयावर टीका केली जात आहे. वेगवेगळ्या प्रकारे अयोग्यरित्या टिप्पणी केल्या जात आहेत. हे प्रकरण न्यायालयासमक्ष विचाराधीन आहे. असे असताना यासंबंधी कुठल्याही प्रकारचे मतप्रदर्शन, टीका करणे अनुचित असून न्यायालयाची अवमानना आहे, असा युक्तीवाद पत्रातून सारस्वत यांनी केला आहे. (New Delhi)

समाज माध्यमांवर जहांगीरपुरीतील बुलडोझर कारवाईवर न्यायालयाच्या निर्देशावर टिका-टिप्पणी करणारे नेते आणि नेटीझन्सचा पूर आला आहे. त्यांच्याकडून द्वेषयुक्त तसेच अभ्रद कमेंट केले जात आहे असा दावा पत्रातून करण्यात आला आहे. हा प्रकार लक्षात घेता आवश्यक निर्देश जारी करणे तसेच कायद्यानूसार स्थापित प्रणालीचे संरक्षण करण्याची विनंती पत्रातून करण्यात आली आहे. सोबतच न्यायपालिकेची प्रतिमा मलीन करणारे बेजबाबदार प्रसार माध्यमे आणि समाज माध्यमांवर नियंत्रण आणण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

 हेही वाचा 

Back to top button