पानसरे खटल्यातील आरोपी विरेंद्र तावडे, सचिन अंदुरेचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला | पुढारी

पानसरे खटल्यातील आरोपी विरेंद्र तावडे, सचिन अंदुरेचा दोषमुक्ती अर्ज फेटाळला

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ कामगार नेते कॉम्रेड गोविंदराव पानसरे हत्येतील मुख्य आरोपी डॉक्टर विरेंद्र तावडे आणि सचिन अंदुरे यांनी खटल्यातून दोष मुक्तीसाठी केलेला अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी आज (सोमवार) फेटाळून लावला. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर आणि अॅड. शिवाजीराव राणे यांनी तावडे व अंदुरे यांच्या अर्जावर हरकत घेऊन त्यांचा दोषमुक्तीचा अर्ज नामंजूर करावा, अशी मागणी केली होती.

आरोपीविरुद्ध पानसरे यांची हत्या आणि केलेल्या प्लॅन संदर्भात सरकार पक्षाकडे भक्कम पुरावा असल्याचेही विशेष सरकारी वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. आरोपीने पाच महिन्यांपूर्वी पानसरे हत्येच्या कटात आपला सहभाग असल्याचे कोणते पुरावे सरकार पक्षाकडे नाहीत. त्यामुळे या हत्याकांडात आपली मुक्तता व्हावी, असा अर्ज आरोपीच्या वतीने अॅड. समीर पटवर्धन आणि अॅड. वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी कोर्टात दाखल केला होता. अर्जावर दोन्ही बाजूने सुनावणी होऊन जिल्हा व सत्र न्यायाधीश शेळके यांनी आरोपींचा अर्ज फेटाळून लावला.

हेही वाचलंत का ? 

Back to top button