दहशतवादाप्रती सहानुभूती दाखविली जाणार नाही : अमित शहा | पुढारी

दहशतवादाप्रती सहानुभूती दाखविली जाणार नाही : अमित शहा

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा : दहशतवाद हे मानवी हक्‍कांच्या उल्‍लंघनाचे सर्वात मोठे माध्यम आहे, त्यामुळे दहशतवादाप्रती कोणत्याही स्वरुपाची सहानुभूती दाखविली जाणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) 13 व्या स्थापना दिवस कार्यक्रमात केले.

दहशतवाद पसरविण्यासाठी अर्थपुरवठा करणार्‍यांचे कंबरडे गेल्या काही काळात मोडण्यात आले आहे, त्यामुळे जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाला बर्‍यापैकी आळा बसला आहे, असेही शहा यांनी यावेळी नमूद केले. मानवी हक्‍कांच्या उल्‍लंघनाचे दहशतवाद हे सर्वात मोठे माध्यम असल्याचे आपले ठाम मत आहे, असे सांगून शहा पुढे म्हणाले की, मानवी हक्‍क अबाधित ठेवायचे असतील तर दहशतवादाच्या मुळावर घाला घातला पाहिजे.

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने दहशतवादाप्रती झिरो टोलरन्स धोरण अवलंबले आहे. टेरर फंडिंगच्या तळापर्यंत जाण्याचे धोरण अवलंबण्यात आल्याने दहशतवादाच्या समर्थकांना दहशतवादी कृत्यांसाठी अर्थपुरवठा करणे कठीण झाले आहे. दहशतवाद संपविण्याच्या कामात एनआयए बजावत असलेली भूमिका कौतुकास्पद आहे, असे गौरवोद‍्गारही शहा यांनी यावेळी काढले.

हेही वाचलत का ?

Back to top button