जम्मू- काश्मीरमध्‍ये चकमकीत 'लश्‍कर'च्‍या कमांडरचा खात्‍मा | पुढारी

जम्मू- काश्मीरमध्‍ये चकमकीत 'लश्‍कर'च्‍या कमांडरचा खात्‍मा

पुढारी ऑनलाईन : जम्‍मू-काश्‍मीरमधील बारामुल्‍ला जिल्‍ह्यातील पेरिसवानी परिसरात आज दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्‍या जवानांमध्‍ये चकमक झाली. यामध्‍ये तीन जवानांसह एक नागरिक जखमी झाला. या चकमकीत लश्‍कर-ए-तोयबाचा कमांडर युसूफ कांतरु ठार झाला आहे.

सूत्राच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील बारामुल्लाच्या पारिसरात दहशतवादी लपल्याची गुप्त माहिती सुरक्षा जवानांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांने या भागात शोधमोहीम सुरू केली. याच दरम्यान दहशतवादी सुरक्षा जवानांवर गोळीबार सुरू केला. चकमकीत दहशतवादी  युसूफ कांतरू  ठार झाला आहे.

लश्‍कर-ए-तोयबाचा कमांडर युसूफ कांतरु हा बडगाम जिल्‍ह्यातील पोलिस अधिकारी, त्‍यांचा भाउ, भारतीय सैन्‍यदलाचा जवान आणि एका नागरिकाच्‍या हत्‍येत सहभागी होता. चकमकीत तो ठार झाला असून त्‍याच्‍याकडून मोठ्या शस्‍त्रसाठा जप्‍त करण्‍यात आला आहे.

चकमकीत ३ जवानांसह आणखी ४ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बारामुल्लाच्या पारिसरात आणखी काही दहशतवादी लपल्याची शक्यता असल्याने सध्या परिसरात शोधमोहिम सुरू असल्‍याचेही पोलीस सूत्रांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button