जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणाचे सूत्रधार सापडले; आरोपी सोनू चिकनाने सांगितले सत्य, एक दिवस अगोदरच... | पुढारी

जहांगीरपुरी हिंसाचार प्रकरणाचे सूत्रधार सापडले; आरोपी सोनू चिकनाने सांगितले सत्य, एक दिवस अगोदरच...

पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली येथील जहांगीरपुरीमध्ये मिरणुकीदरम्यान झालेल्या हिंसाचाराचा कट पहिल्यांदाच रचण्यात आला होता. मिरवणूक निघणार, त्याच्या एक दिवस अगोदरच दंगलीची संपूर्ण व्यवस्था करण्यात आली होती, असा धक्कादायक खुलासा आरोपी सोनू चिकना उर्फ युनूस केला आहे. पुरावे म्हणून एक दिवस अगोदरचे सीसीटीव्ही फुटेजदेखील देण्यात आले आहेत.

पोलिसांच्या चौकशीत सोनू चिकनाने आपला गुन्हा कबूल केला. त्याने सांगितले की, हनुमान जयंती दिवशी कुशल चौकात फायरिंग केलेली होती. पोलिसांनी त्याच्याकडून एक बंदूकदेखील जप्त केलेली आहे. सोनू चिकानाने सांगितले की, ही बंदूक खूप दिवसांपूर्वीच मी माझ्या ओळखीच्या माणसाकडून घेऊन घरात ठेवली होती.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सोनूवर अनेक गुन्हे नोंद आहेत. तो मूळचा हाल्दिया, पश्चिम बंगालचा रहिवाशी आहे. त्याला ८ भाऊ आणि ३ बहिणी आहेत. दंगलीच्या प्रकरणात त्याचा भाऊ सलीमदेखील पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याच्यावरही लटणे आणि हत्या करण्याचे गुन्हे दाखल आहेत.

१७ एप्रिलला सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये बंदुकीतून फायरिंग करताना दिसून आला. याच व्हिडिओच्या आधारावर पोलिसांनी त्याला ओळखले आणि त्याला सोमवारी रात्री अटक केली. यापूर्वी सोनू चिकनाच्या कुटुंबाने पोलिसांवर दगडफेक केली होती. त्यात पोलीस निरीक्षक सतेंद्र खाली जखमी झाले होते. पोलिसांना या प्रकरणात सोनूची नातेवाईक असणारी सलमा नावाच्या महिलेला अटक केलेली आहे.

सोनूने चौकशीत असे सांगितेल की, त्याने एक दिवस अगोदरच मिरवणुकीत काहीतरी गडबड होणार याची कल्पना होती. कित्येक दिवसांपासून अन्सार, सलीम आणि अस्लम नावाचे आरोपी तयारी करत होते. प्रत्येक वर्षी या परिसरात ही मिरवणूक काढली जाते. आरोपीने दंगल घडवून आणण्याचा कट रचला.

दरम्यान पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज हाती लागले. ज्यामध्ये एक दिवस अगोदर रात्री उशिरा २ वाजण्याच्या सुमारास काही तरूण काठ्यांची व्यवस्था करताना दिसत होते. पोलीस सूत्रांकडून असं सांगण्यात आले आहे की, दंगलीमध्ये तरुणांची स्थानिक लोकांमध्ये वादावादी झाली. आता दिल्ली पोलीस स्थानिक लोकांची जबाब नोंदवून घेणार आहे. जेणे करून न्यायालयात ते सिद्ध केले जाईल. दिल्ली पोलीस सीसीटीव्ही फुटेज मुख्य पुरावा मानत आहे.


पहा व्हिडिओ : एस.टी. संपाचा निकाल | पुढारी

Back to top button