अनिल देशमुख, सचिन वाझेला न्‍यायालयीन कोठडी | पुढारी

अनिल देशमुख, सचिन वाझेला न्‍यायालयीन कोठडी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : राज्‍याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख, बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझे, देशमुख यांचे साथीदार संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना आज सीबीआयच्‍या विशेष न्‍यायालयाने १४ दिवसांची न्‍यायालयीन कोठडी सुनावली.

मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख, संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडीने अटक केली होती. ते न्‍यायालयीन कोठडीत होते. तर सचिन वाझे हा मनसुख हिरेन खून प्रकरणात न्‍यायालयीन कोठडीत होता. सीबीआयने या चौघांचा ताबा घेतला होता. शनिवारी त्‍यांना सीबीआयच्‍या विशेष न्‍यायालयासमोर हजर केले. यावेळी सीबीआयने देशमुख यांना आणखी तीन दिवसांच्‍या सीबीआय कोठडीत वाढ करण्‍याची मागणी केली. मात्र ते फेटाळत न्‍यायालयाने चारही संशयित आरोपींना न्‍यायालयीयन कोठडी सुनावली.

या महिन्याच्या सुरुवातीला, सर्व आरोपींना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात केंद्रीय अन्वेषण विभागाच्या कोठडीत ठेवण्यात आले होते आणि त्यांची रिमांड संपल्यानंतर शनिवारी त्यांना विशेष सीबीआय न्यायाधीश डीपी शिंगाडे यांच्यासमोर हजर करण्यात आले होते.

वाजे, पालांडे आणि शिंदे यांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी न करता सीबीआयने देशमुख यांना आणखी तीन दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली. मात्र, सीबीआयची याचिका फेटाळून लावत न्यायालयाने चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली. यापूर्वी देशमुख, वाझे, पालांडे आणि कुंदन शिंदे याआरोपींना पाच दिवसांची सीबीआय कोठडी देण्‍या आली होती.

हेही वाचा :

 

Back to top button