काँग्रेसच्या डिजीटल सदस्‍य अभियानात सोनिया गांधी यांनी केली नोंदणी | पुढारी

काँग्रेसच्या डिजीटल सदस्‍य अभियानात सोनिया गांधी यांनी केली नोंदणी

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या विशेष सदस्यत्व मोहिमेच्या शेवटच्या दिवशी, पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पक्षाचे डिजिटल सदस्य म्हणून नाव नोंदविले. सोनिया गांधी यापूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे काही ज्येष्ठ नेते डिजिटल सदस्य झाले आहेत. तसेच येणा-या संघटनेच्या निवडणुकीत सोनिया गांधी यामध्ये सहभागी होणार आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या डेटा ॲनसलिसिसचे विभाग प्रमुख प्रवीण चक्रवर्ती यांनी सोनिया गांधी यांचे नाव डिजिटल सदस्य म्हणून नोंदविले. त्‍यानंतर काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सोनिया गांधी यांना डिजिटल ओळखपत्र प्रदान केले. काही दिवसापूर्वी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि इतर अनेक वरिष्ठ काँग्रेस नेते पक्षाचे डिजिटल सदस्य बनले होते.

काँग्रेसकडून ही विशेष सदस्यत्व मोहीम 15 दिवसांनी वाढवली होती. आणि ती 15 एप्रिलपर्यंत सुरू होती. ही मोहिम 20 राज्यांमध्ये सुरू होती. या मोहिमेद्वारे 2.5 कोटींहून अधिक सदस्यांनी यामध्ये नोंद केली आहे, असे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.

या राज्यांत डिजिटल मोहिम नाही

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा या पाच राज्‍यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्‍या आहेत. यामुळे काँग्रसने या पाच राज्‍यात डिजिटल सदस्यत्व मोहीमेचा कार्यक्रम घेतला नाही. तर कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ आणि आंध्र प्रदेश ही पाच राज्ये 55 टक्के डिजिटल सदस्यांपैकी आहेत. यामध्ये एकूण सदस्यांपैकी 12 टक्के सदस्य हे एकटया महाराष्ट्रात आहेत. पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पक्षाची सदस्यत्व मोहीम 31 मार्च रोजी संपणार होती. परंतु गेल्या वर्षी १ नोव्हेंबरपासून या मोहिमेला सुरुवात झाली.

हेही वाचा  

Back to top button