दिल्लीकरांना १५ एप्रिलनंतर तीव्र उष्णतेपासून मिळणार दिलासा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाची राजधानी दिल्ली एप्रिल महिन्यातच कडक उन्हाळ्यामुळे होरपळून निघालेली आहे. मात्र येत्या १५ तारखेपासून उष्णतेचा प्रकोप कमी होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसांतील उष्णतेने तब्बल १२२ वर्षांचा विक्रम मोडला आहे. मागील काही दिवसांपासून दिल्लीचे कमाल तापमान ४० अंशाच्या वरच राहिलेले आहे. सोमवारी तर पारा ४२ अंश सेल्सिअसच्या वर गेला होता.
एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवड्यात उष्णतेचा प्रकोप कमी होणार असला, तरी पारा मात्र फारसा कमी होणार नसल्याचे हवामान खात्याचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे मार्च महिन्यातला उष्णतेचा १२१ वर्षाचा विक्रम यंदा मोडला गेला होता. त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसांतील १२२ वर्षाचा विक्रम मोडला गेला आहे. कडक उन्हाळ्यामुळे सामान्य दिल्लीकरांचे मात्र मोठे हाल सुरु आहेत.
हेही वाचलंत का ?
- UP MLC Election : उ. प्रदेश विधान परिषदेत भाजपला बहुमत, सपा-बसपाला ४० वर्षांमध्ये जमले नाही ते योगींनी करुन दाखवलं
- झारखंड रोपवे दुर्घटना : ४६ तासांच्या बचावकार्यानंतर सर्वांची सुखरूप सुटका
- Skymet : आनंदवार्ता! यंदाचा मान्सून शेतीसाठी कसा असेल?