CBSE Answer Sheet : CBSE टॉपर्सची उत्तरपत्रिका बोर्डाच्या साईटवर होणार अपलोड | पुढारी

CBSE Answer Sheet : CBSE टॉपर्सची उत्तरपत्रिका बोर्डाच्या साईटवर होणार अपलोड

पुढारी ऑनलाईन डेस्क : CBSE Class 10th 12th Exam 2022: 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) 10वी-12वी बोर्ड परीक्षेतील टॉपर्सच्या उत्तर पत्रिकेची कॉपी त्यांच्या वेबसाइट cbse.gov.in किंवा cbseresults.nic.in वर अपलोड करण्यात येणार आहे. (cbse answer sheet)

यासोबतच टॉपर्स विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेची प्रत ऑनलाईन तर दिसेलच पण त्याच बरोबर ती शाळांनाही पाठवली जाणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे इतर विद्यार्थ्यांना उत्तर पत्रिका कशी लिहिली जावी हे समजण्यासाठी सीबीएसईकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे समजत आहे. (cbse answer sheet)

दरम्यान, CBSE ने टर्म-1 परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर केला नाही, परंतु इयत्ता 10वी आणि 12वी टर्म-1 चे निकाल संलग्न शाळांना पाठवण्यात आले. (cbse answer sheet)

CBSE टर्म-2 परीक्षा 26 एप्रिलपासून सुरू होणार असून 15 जून रोजी संपणार आहे. मात्र, 10 वी ची परीक्षा 24 मे रोजी संपणार आहे. तर 12 वी ची परीक्षा 15 जून रोजी संपणार आहे. मात्र, रोल नंबरमध्ये कोणताही बदल होणार नाही. टर्म-1 परीक्षेत विद्यार्थ्यांना जो रोल नंबर दिला होता, तोच रोल नंबर टर्म-2 परीक्षेसाठी राहिल. मात्र विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र नवीन डाउनलोड करावे लागेल. (cbse answer sheet)

CBSE त्यांच्या वेबसाइट cbseacademic.nic.in वर प्रवेशपत्र जारी करेल. मात्र विद्यार्थ्यांना शाळेच्या मदतीने प्रवेशपत्र डाऊनलोड करावे लागेल. (cbse answer sheet)

Back to top button