नीती आयोगाच्या प्रदेश ऊर्जा आणि पर्यावरण निर्देशांकात महाराष्ट्र पहिल्या तीनमध्येही नाही | पुढारी

नीती आयोगाच्या प्रदेश ऊर्जा आणि पर्यावरण निर्देशांकात महाराष्ट्र पहिल्या तीनमध्येही नाही

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नीती आयोगाकडून प्रदेश ऊर्जा आणि पर्यावरण निर्देशांक राउंड वन (एसईसीआय) जाहीर करण्यात आली आहे. यामाध्ये देशातील पहिल्या तीन राज्यात येण्‍यास महाराष्ट्राला अपयश आले आहे. या यादीत प्रथमस्‍थानी गुजरात तर  द्वितीय केरळ आणि तिसऱ्या क्रमांकावर पंजाब आहे.

सूत्रांनी दिलेल्‍या माहितीनुसार, वीज वितरण कंपन्यांची कामगिरी, ऊर्जा वापराची प्रभावशीलता, पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने केलेले उपाय, ऊर्जा व पर्यावरण क्षेत्रासाठी नव्याने हाती घेतलेल्या योजना आदी निकषांवर नीती आयोगाने राज्यांची निवड केली आहे. प्रदेश ऊर्जा आणि पर्यावरण निर्देशांकात सर्वांत शेवटच्या क्रमांकावर छत्तीसगड असून मध्य प्रदेश आणि झारखंड राज्‍यांचा समावेश आहे. छोट्या राज्यांमध्ये गोवा प्रथम क्रमांकावर असून त्रिपुरा व मणिपूर क्रमश: दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे.

हेही वाचा  

Back to top button