अदर पुनावाला : ‘खासगी रुग्णालयात कोविशिल्डच्या बुस्टर डोससाठी ६०० रुपये मोजावे लागणार; टॅक्स वेगळा बसणार’ | पुढारी

अदर पुनावाला : 'खासगी रुग्णालयात कोविशिल्डच्या बुस्टर डोससाठी ६०० रुपये मोजावे लागणार; टॅक्स वेगळा बसणार'

पुढारी ऑनलाईन डेस्क : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी कोरोना लसीच्या बुस्टर डोससंदर्भात जो निर्णय घेण्यात आला आहे, त्याचं स्वागत केले आहे. ते म्हणाले की, “अगदी योग्य वेळी केंद्राने हा निर्णय घेतलेला आहे. देशात अनेक ठिकाणी लोक फिरण्याचे आयोजन करत आहेत. त्यामध्ये अनेक अडचणी येत आहे, त्यामुळे त्यांनी कोरोनाचा तिसरा अर्थात बुस्टर डोस घेतला नसल्याचीही अडचण आहे.”

केंद्राने बुस्टर डोस घेण्याची परवानगी जरी दिली असली तरी हा डोस मोफत उपलब्ध होणार नाही. अदर पुनावाला यांच्या म्हणण्यानुसार कोविशिल्डची किंमत ६०० रुपये आणि त्यावरील टॅक्ससहीत असणार आहे, त्याचबरोबर कोवोव्हॅक्सचीचा बुस्टर डोसची किंमत ९०० रुपय असून त्यावर टॅक्स लागणार आहे. कोवोव्हॅक्स लसीला लवकरत बुस्टर डोस देण्यासंदर्भात मंजुरी मिळण्याची आशा आहे.

केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे की, पहिला आणि दुसरा डोस सरकारी लसीकरण केंद्रांवर मोफत लसीकरण कार्यक्रमाशिवाय हेल्थवर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ६० वर्षांच्या पुढील नागरिकांना डोस देण्याचा कार्यक्रम सुरू राहणार आहे. देशात १५ वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या ९६ टक्के लोकांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला आहे. तसेच ८३ टक्के लोकांनी दुसरा डोसही घेतला आहे. १२ ते १४ वय वर्षे असणाऱ्या ४५ टक्के मुलांनी पहिला डोस घेतलेला आहे.

बुस्टर डोससंदर्भात केंद्राने घेतलेला निर्णय

देशातील कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय असा की, १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना आता रविवार म्हणजेच १० एप्रिलपासून खासगी लसीकरण केंद्रावर कोरोनाचा तिसरा डोस अर्थाच बुस्टर डोस दिला जाणार आहे.

जर कोणी व्यक्ती कोरोनाचा बुस्टर डोस घेऊ इच्छित असेल तर, त्यांनी खासगी रुग्णालयात जाऊन तिसरा डोस घेऊ शकतो. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार १८ वर्षांपेक्षा जास्त वय असणारे सर्व नागरिक हा बुस्टर डोस घेऊ शकतात. असं असलं तरी बुस्टर डोस घेणं अनिवार्य नाही. ते पुर्णपणे एच्छिक आहे. ज्या नागरिकांना बुस्टर डोस महत्वाचा वाटतो, ते नागरिक तिसरा डोस घेऊ शकतात.

Back to top button