सीतापूर (उत्तरप्रदेश) पुढारी ऑनलाईन : "मी तुम्हाला प्रेमपूर्वक सांगत आहे की, जर खैराबादमध्ये एका जरी हिंदू मुलीची छेड काढली तर, मी तुमच्या मुलींना आणि सुनांना घरातून बाहेर घेऊन जाईन आणि सार्वजनिक ठिकाणी त्यांच्यावर बलात्कार करेन", अशी खुली धमकी सीतापूरच्या महर्षि श्री लक्ष्मण दास उदासीन आश्रमचे कथित संत बजरंग मुनी दास यांनी मुस्लीम महिलांना दिली आहे.
सीतापूर जिल्ह्यातील खैराबाद कसब्यात नवरात्री आणि हिंदू नव्या वर्षाच्या निमित्ताने मिरवणूक काढली होती. तिथेच एका मशीदीबाहेर लोकांसमोर भाषण करताना कथित संत बजरंग मुनी दास यांनी मुस्लिमांनी प्रत्यक्षपणे धमकी दिली आहे. लाऊड स्पीकरवरून द्वेषपूर्ण भाषण दिले आहे. या द्वेषपूर्ण भाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे कथित महंत म्हणत आहे की, "तुम्हाला अजूनही प्रेमाने सांगत आहे की, जर एखाद्या हिंदू मुलीची तुम्ही छेड काढली, तर तुमच्या मुलींना आणि सुनांना शहराबाहेर घेऊन सार्वजनिकरित्या बलात्कार करेन." त्याच्या द्वेषपूर्ण भाषणावर उपस्थितांमध्ये 'जय श्रीराम'चा घोषणा देण्यात येत होत्या. हा व्हिडिओ फॅक्ट चेकर महमंद जुबेर यांनी ट्विट केलेला आहे. एकूण २ मिनिटांचा व्हिडिओ असून त्यामध्ये संपूर्ण द्वेषपूर्वक भाषण केलेले दिसून येत आहे.
या कथित महंताने माझा खून करण्याचा प्रयत्न केला आहे, इतकंच नाही तर माझ्या खुनासाठी २८ लाख रुपये गोळा करण्यात आलेली आहे. या व्हिडिओवर सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. या संताविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी नेटकरी करत आहेत. या व्हिडिओवर सीतापूर जिल्ह्याचे पोलीस आयुक्त राजीन दीक्षित यांच्याद्वारे चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.