Pathan : शाहरुखची २०१८ नंतर 'पठाण'मधून एन्ट्री, खानसह 'या' स्टार्सनी किती पैसे घेतले? | पुढारी

Pathan : शाहरुखची २०१८ नंतर 'पठाण'मधून एन्ट्री, खानसह 'या' स्टार्सनी किती पैसे घेतले?

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा २०१८ पासून एकही चित्रपट आलेला नाही. मात्र आता किंग खानच्या चाहत्यांना जास्त वाट पाहावी लागणार नाही. २०१८ च्या त्याच्या शेवटच्या झिरो चित्रपटानंतर शाहरुख खानचा आगामी चित्रपट येतोत. पठाण (Pathan) हा त्याचा चित्रपट २५ जानेवारी, २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. बॉलीवूडमधील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक असलेल्या ‘पठाण’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यापासून बरीच चर्चा झाली आहे. शाहरुख खानशिवाय या चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांचाही समावेश आहे. (Pathan)

शाहरुखने पठाणसाठी तगडी फी घेतली आहे

मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खानने पठाणसाठी मोठी रक्कम घेतली आहे. सूत्रांनुसार, शाहरुख खान या चित्रपटाची फी घेत नसून कमाईत भाग घेत असल्याचे म्हटले जात आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, सुपरस्टारला १०० कोटी रुपये आणि नफ्यातील हिस्सा दिला जात आहे.

पठाणमधून शाहरुख बॉलिवूडचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता ठरला असल्याचे म्हटले जात आहे. शाहरुख खान फीच्या बाबतीत अक्षय कुमार, अजय देवगणपेक्षा जास्त कमाई करणारा अभिनेता ठरला आहे. एका वेबसाईटनुसार, शाहरुख खानची ही फी अक्षय कुमार आणि सलमान खान सारख्या अभिनेत्यांपेक्षा खूप जास्त आहे.

depika padukone

दीपिका पदुकोण पठाणसाठी किती पैसे घेतेय?

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण बऱ्याच काळानंतर ‘पठाण’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात दीपिका मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे. या चित्रपटासाठी दीपिका पदुकोणनेही मोठी रक्कम घेतली आहे. या चित्रपटासाठी दीपिका पदुकोणला १५ कोटी रुपये दिले जात आहेत.

john abraham

जॉन अब्राहमने पठाणसाठी किती पैसे घेतले?

जॉन अब्राहमही पठाण या चित्रपटात दिसणार आहे, मात्र या चित्रपटातील त्याच्या भूमिकेबाबत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॉन अब्राहमला पठाणसाठी २० कोटी रुपये मानधन दिले जात आहे.

nayantara

पठाणशिवाय शाहरुखचा दिसणार या प्रोजेक्टमध्ये

एसआरकेने सप्टेंबर २०२१ मध्ये ॲटलीच्या चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. पठाण व्यतिरिक्त हा चित्रपट शाहरुख खानचा बॅक टू बॅक रिलीज होणार आहे. अॅटली या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप सांगण्यात आलेली नाही.

एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, ” शाहरुखने चित्रपटावर काम करण्यास सुरुवात केलीय. नयनतारा आणि तेलुगू सुपरस्टार राणा दग्गुबती देखील दिसणार आहे.” या चित्रपटात नयनतारा मुख्य भूमिकेत आहे आणि ही अभिनेत्री काही दिवसांपूर्वी मुंबई विमानतळावरून बाहेर पडली तेव्हा ती कॅमेराबद्ध झाली होती. या चित्रपटात सान्या मल्होत्रा आणि सुनील ग्रोव्हर यांच्याही भूमिका आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

Back to top button