राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यांत नकाशांचे डिजिटायजेशन | पुढारी

राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यांत नकाशांचे डिजिटायजेशन

शिवाजी शिंदे

पुणे : राज्यात 28 जिल्ह्यांतील भूमिअभिलेख विभागांच्या नकाशांचे डिजिटायजेशनचे काम सुरू आहे. राज्यात भूमिअभिलेख विभागांच्या कार्यालयात असलेले अत्यंत दुर्मीळ तसेच जुन्या नकाशांचे (अभिलेखांचे) डिजिटायजेशन करण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. गेल्या दोन वर्षांत राज्यातील 34 जिल्ह्यांपैकी 6 जिल्ह्यांतील सुमारे 1 कोटी 5 लाख नकाशांचे डिजिटायझेशनचे काम पूर्ण झाले आहे.

मोठी बातमी! संजय राऊत यांची संपत्ती ईडीकडून जप्त

भूमिअभिलेख या विभागामध्ये राज्यातील जमिनींची मोजणी, फाळणी, फेरफार, सातबारा खाते उतारा, यासह इतर अनेक नकाशे (अभिलेख) आहेत. ब्रिटिशकाळासह त्याच्याही अगोदरचे अनेक नकाशे या विभागाकडे अजूनही अस्तित्वात आहेत. मात्र, काळाच्या ओघात हे नकाशे दुर्मीळ होत चालले आहेत. तसेच, या नकाशांचा कागद अतिशय जीर्णावस्थेत आहे. काही नकाशांचे जतन व्यवस्थित केले न गेल्याने त्यांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे, तर काही नकाशांची स्थिती अत्यंत दयनीय झाली आहे. असे दुर्मीळ नकाशे योग्य प्रकारे जतन करता यावेत, यासाठी या विभागाने या नकाशांचे डिजिटायजेशन करण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी घेतला. त्यानुसार या विभागातील पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, मुंबई, या विभागांत असलेल्या सहा जिल्ह्यांत दोन वर्षांपूर्वी नकाशांचे डिजिटायझेशन करण्यात आले.

नांदेड हादरले! प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांचा गोळ्या झाडून खून

158 कोटींचा निधी

नकाशांचे डिजिटायजेशन करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने सुमारे 158 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. आतापर्यंत त्यातील सुमारे 30 कोटी रुपयांच्या आसपास खर्च झालेला आहे. 28 जिल्ह्यांतील 3 कोटी 60 लाख नकाशांचे डिजिटायझेशनचे काम लवकर सुरू करण्यात येणार आहे. केंद्र शासनाच्या भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीमार्फत डिजिटायजेशनचे काम करण्यात येणार आहे.

हेही वाचा

Shanghai Corona : चीनच्या शांघायमध्ये कोरोनाचा कहर; रुग्णालये भरली, कडक लॉकडाउनमुळे नागरीक उपाशी

आरोप सिद्ध झाल्यास सर्व संपत्ती भाजपला दान करीन : संजय राऊत

कर्नाटकात नवा वाद! ‘हलाल’ मांस विरोधानंतर आता मशिदीतील लाउडस्पीकरवर बंदीची मागणी

Back to top button