महापालिकेस ई-गर्व्हनन्स अ‍ॅण्ड इकोनॉमी पुरस्कार | पुढारी

महापालिकेस ई-गर्व्हनन्स अ‍ॅण्ड इकोनॉमी पुरस्कार

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्लीतील स्मार्ट सिटीज इंडिया व कन्व्हर्जन्स इंडिया 2022 एक्स्पोमध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पीसीएमसी स्मार्ट सारथी उपक्रमाला ई-गर्व्हनन्स अ‍ॅण्ड इकोनॉमी पुरस्काराने शुक्रवारी (दि.25) गौरविण्यात आले.

महापालिकेचे आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश पाटील यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या पुरस्काराने पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकीकात भर पडली आहे.

राजू शेट्टी म्हणतात तर देवेंद्र भुयार यांना पुन्हा संघटनेत घेणार

इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनद्वारे देशातील 100 स्मार्ट सिटीसाठी हे एक्सो भरविण्यात आले. पालिकेतर्फे स्मार्ट सिटी प्रकल्प, उपक्रम व उपलब्धी दाखवण्यासाठी डिस्प्ले स्टॉल लावण्यात आला.

स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी निळकंठ पोमण यांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट सिटीचे विवेक पाटील, सीटीओ टीमच्या ऋतुजा करकरे यांनी सहभाग घेतला.

महाड : किरीट सोमय्यांना स्थानिक पत्रकारांचे वावडे : पदाधिकाऱ्यांनाही झापले

कोविड काळात प्रशासनाची महत्त्वाची भूमिका, माहिती गोळा करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा केलेला वापर, स्टार्टअप्स मिळणारे प्राधान्य, नागरिकांना राहण्यायोग्य व शहरे निर्माण करण्यासाठी उपाययोजना, स्मार्ट शहराची संकल्पना तसेच, विविध प्रकल्पांचे व्हिडीओद्वारे प्रदर्शनात सादरीकरण करण्यात आले.

देश-विदेशातील उद्योग संस्था, नामवंत कंपन्यांच्या प्रतिनिधींनी या स्टॉलला भेट देवून प्रकल्पांची माहिती घेतली.शहरातील नागरिकांना वेळेत व सातत्यपूर्ण माहिती मिळण्यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी अ‍ॅप सुरू केले आहे. या अ‍ॅपला पुरस्कार

Back to top button