PM CARES Fund: पीएम केअर फंडसंदर्भातील याचिकेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार | पुढारी

PM CARES Fund: पीएम केअर फंडसंदर्भातील याचिकेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

नवी दिल्ली पुढारी वृत्तसेवा: पीएम केअर फंडच्या माध्यमातून किती पैसा जमविण्यात आला, किती खर्च करण्यात आला, कोणकोणती कामे करण्यात आली आदी तपशील जाहीर करण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले जावेत, अशा विनंतीच्या याचिकेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने आज नकार दिला. 2020 च्या सुरुवातीला कोरोनाचे संकट सुरु झाले होते, त्यावेळी सरकारने पीएम केअर फंडची सुरुवात केली होती.

न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या खंडपीठासमोर दाखल झालेल्या या याचिकेत पीएम केअर्स फंडचे महालेखापरिक्षकांमार्फत ऑडिट केले जावे, अशी विनंतीही करण्यात आली होती. या प्रकरणी याचिकाकर्त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी, असे निर्देश खंडपीठाने दिले. पीएम केअर फंडसंदर्भातील याचिका याआधी अलाहाबाद उच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.

हेही वाचलं का?

Back to top button