मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या पुष्पक ग्रुपची ६ कोटी ४५ लाखांची संपत्ती ईडीने जप्त करत कारवाई केली आहे. याबाबत बाेलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, "केंद्रीय यंत्रणा स्वायत्त राहिलेल्या नाहीत. केवळ विराेधी पक्षाचे नेते व त्यांच्या नातेवाईकांवरच कारवाई कशी हाेते. भाजप नेत्यांवर कारवाई का केली जात नाही".
यावेळी साखदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकार चांगलेच घारेवर धरले आहे. विरोधी पक्ष खोटे पुरावे सादर करत आहेत. विरोधकाकडे बोलायला मुद्दे नाहीत. महागाईच्या प्रश्नाकडे केंद्र सरकार का दुर्लक्ष करत आहे, असा सवालही त्यांनी केला.
उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीची कारवाई हेवू शकते. परंतु, भाजप नेत्यावर कारवाई होत नाही, असा सवालही त्यांनी केला. विराेधी पक्ष राजकीय सूडातून कारवाई करत असली तरी आम्ही तसे वागणार नाही. आमचे संस्कार आणि संस्कृती नाही. मात्र अन्यायाविरोधात आमचा लढा सुरुच राहिल, असेही त्यांनी सांगितले.
हेही वाचलंत का?