नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : ऑस्ट्रेलियातून परत आणलेल्या पुरातन मूर्ती आणि वस्तूंची पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि.२१) केली. भारतातून चोरी करून वा इतर मार्गाने या पुरातन वस्तू ऑस्ट्रेलियात गेल्या होत्या. अलीकडेच यातील २९ मूर्ती व वस्तू परत आणण्यात आल्या आहेत. या मूर्तींमध्ये शिव, विष्णू आणि देवी प्रतिमा तसेच जैन परंपरेतील मूर्ती व सजावट वस्तूंचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियातून आणलेल्या या वस्तुंना सहा श्रेणीत ठेवण्यात आले आहे. पुरातन वस्तूंमध्ये बलुआ प्रकाराचा दगड, संगमरवर, कांस्य आणि पितळेच्या मूर्ती, विविध प्रकारचे पेंटिंग्ज यांचा देखील समावेश आहे.
या वस्तू राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा तसेच प. बंगालसह इतर राज्यांशी संबंधित असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियाद्वारे दिली आहे.
हेही वाचलंत का?