होळी राहिली बाजूला, पण पडला ‘पायताणांचा’ पाऊस ! (video)

होळी राहिली बाजूला, पण पडला ‘पायताणांचा’ पाऊस ! (video)

पाटणा; पुढारी ऑनलाईन : रंगांची उधळण, मिठाईचे वाटप, नाचगाण आणि सर्वत्र एकच जल्‍लोष असे उत्तरेतील राज्‍यांमध्‍ये होळीचे वातावरण ( Holi Celebrations ) असते. आयुष्‍यात नवस्‍वप्‍नांबरोबर आनंदाची उधळण करत येणारा हा सण सर्वसामान्‍यांचा आनंद व्‍दिगुणीत करतो. मात्र बिहारची राजधानी पाटणामध्‍ये एका वॉटरपॉर्कमध्‍ये होळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात तरुणाईच्‍या उत्‍साहाला उधाण आलं आणि क्षणात रंगाचा बेरंग झाला.

Holi Celebrations : … आणि रंगाचा झाला बेरंग

पाटणामधील एका वॉटरपॉर्कमध्‍ये होळीनिमित्त रंग उधळण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी अचानक मुलांनी एकमेंकांवर चप्‍पल फेकणे सुरु केले. पुढे काही क्षणात वॉटर टँकमध्‍ये 'पायताणचा' पाऊसच पडला. एकमेकांवर चप्‍पल फेकण्‍याची जणू स्‍पर्धाच लागली. या घटनेचा व्‍हिडीओ सोशल मीडियावर व्‍हायरल होत असून, होळीनिमित्त रंगाच्‍या पावसाऐवजी चप्‍पलांचा पडलेला पावसाची चर्चा राजधानी पाटणामध्‍ये होत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news